▪️ कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
▪️ लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :
600 ते 1500 : 7 सभासद
1501 ते 3000 : 9 सभासद
3001 ते 4500 : 11 सभासद
4501 ते 6000 : 13 सभासद
6001 ते 7500 : 15 सभासद
7501 त्यापेक्षा जास्त : 17 सभासद
▪️ निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
▪️ कार्यकाल : 5 वर्ष
▪️ विसर्जन : कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.
▪️ आरक्षण :
1 : महिलांना : 50%
2 : अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात
3 : इतर मागासवर्ग : 27% [महिला 50%]
▪️ ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :
1 : तो भारताचा नागरिक असावा.
2 : त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
3 : त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.
▪️ ग्रामपंचायतीचे विसर्जन :
विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.
▪️ सरपंच व उपसरपंच यांची निवड :
निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते. (सध्या थेट सरपंच निवडणूक बाबत शासन निर्णय झालेला आहे.)
▪️ सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल :
5 वर्ष इतका कार्यकाल असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.
▪️ राजीनामा :
सरपंच : पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.
उपसरपंच : सरपंचाकडे
▪️ निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :
सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.
▪️ अविश्वासाचा ठराव :
सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
▪️ बैठका : एका वर्षात 12 बैठका होतात [म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक]
▪️ अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच
▪️ तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.
▪️ अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.
▪️ आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.
▪️ ग्रामसेवक / सचिव :
निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.
नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.
नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.
कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा.
▪️ ग्रामसेवकाची कामे :
» ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
» ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
» कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे.
» ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
» व्हिलेज फंड सांभाळणे.
» ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
» ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
» गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
» जन्म-मृत्यूची नोंद करणे.
▪️ ग्रामपंचातीची कामे :
» कृषी
» समाज कल्याण
» जलसिंचन
» ग्राम संरक्षण
» इमारत व दळणवळण
» सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
» सामान्य प्रशासन
▪️ ग्रामसभा :
तरतूद » मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.
बैठक » आर्थिक वर्षात [26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर]
सभासद » गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.
अध्यक्ष » सरपंच नसेल तर उपसरपंच
गणपूर्ती » एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण 100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!