प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार11 मे 1878 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष न्या. रानडे यांनीभूषविले होते.
दुसरे संमेलन 1885 साली पुन्हा पुण्यामध्येच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने जास्त नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. 21 मे 1885 रोजी सार्वजनिक सभेच्या दाणे आळी, बुधवार पेठ येथील जोशी हॉलमध्ये भरले होते. यानंतर मात्र तब्बल जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन 1905 मध्ये सातारा येथे भरले. लोकमान्य टिळकांचे सहकारी सुप्रसिद्ध वकील दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. साताऱ्या पाठोपाठ 04 थे संमेलन पुन्हा पुणे येथे 27 व 28 मे 1906 रोजी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले होते.
मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित 'साहित्य दरबारातील दशरत्ने' नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.
साहित्य संमेलन अध्यक्ष
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत शक्यतो प्रत्येक वर्षी साहित्य संमेलने घेतली आहेत. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी मात्र कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम लेखक आणि यू. म. पठाण इत्यादी लेखक अध्यक्ष झालेले आहेत.
मराठी विकास संस्थेचे निमंत्रित सदस्य
अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे राज्य मराठी विकास संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य असतात
साहित्य संमेलन अध्यक्ष - वर्ष - ठिकाण
〉 १८७८ : पुणे
» न्या. महादेव गोविंद रानडे
〉 १८८५ : पुणे
» कृष्णशास्त्री राजवाडे
〉१९०५ : सातारा
» रघुनाथ पांडुरंग करंदीकर
〉 १९०६ : पुणे
» वासुदेव गोविंद कानिटकर
〉 १९०७ : पुणे
» विष्णू मोरेश्वर महाजनी
〉 १९०८ : पुणे
» चिंतामण विनायक वैद्य
〉 १९०९ : बडोदे
» कान्होबा रामछोडदास कीर्तिकर
〉 १९१२ : अकोला
» हरी नारायण आपटे
〉 १९१५ : मुंबई
» गंगाधर पटवर्धन
〉 १९१७ : इंदूर
» गणेश जनार्दन आगाशे
〉 १९२१ : बडोदे
» नरसिंह चिंतामण केळकर
〉 १९२६ : मुंबई
» माधव विनायक किबे
〉 १९२७ : पुणे
» श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
〉 १९२८ : ग्वाल्हेर
» माधव श्रीहरी अणे
〉 १९२९ : बेळगांव
» शिवराम महादेव परांजपे
〉 १९३० : मडगांव
» वामन मल्हार जोशी
〉 १९३१ : हैदराबाद
» श्रीधर व्यंकटेश केतकर
〉 १९३२ : कोल्हापूर
» महाराजा सयाजीराव गायकवाड
〉 १९३३ : नागपूर
» कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
〉 १९३४ : बडोदे
» नारायण गोविंद चापेकर
〉 १९३५ : इंदूर
» भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
〉 १९३६ : जळगाव
» माधव जुलियन/माधव त्रिंबक पटवर्धन
〉 १९३८ : मुंबई
» विनायक दामोदर सावरकर
〉 १९३९ : अहमदनगर
» दत्तो वामन पोतदार
〉 १९४० : रत्नागिरी
» नारायण सीताराम फडके
〉 १९४१ : सोलापूर
» विष्णू सखाराम खांडेकर
〉 १९४२ : नाशिक
» प्रल्हाद केशव अत्रे
〉 १९४३ : सांगली
» श्रीपाद महादेव माटे
〉 १९४४ : धुळे
» भार्गवराम विठ्ठल वरेरकर
〉 १९४६ : बेळगांव
» गजानन त्र्यंबक माडखोलकर
〉 १९४७ : हैदराबाद
» नरहर रघुनाथ फाटक
〉 १९४९ : पुणे
» शंकर दत्तात्रय जावडेकर
〉 १९५० : मुंबई
» यशवंत दिनकर पेंढारकर/कवी यशवंत
〉 १९५१ : कारवार
» अनंत काकबा प्रियोळकर
〉 १९५२ : अमळनेर
» कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी
〉 १९५३ : अहमदाबाद
» वि.द. घाटे
〉 १९५४ : दिल्ली
» लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
〉 १९५५ : पंढरपूर
» शंकर दामोदर पेंडसे
〉 १९५७ : औरंगाबाद
» अनंत काणेकर
〉 १९५८ : मालवण
» अनिल/ आत्माराम रावजी देशपांडे
〉 १९५९ : मिरज
» श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
〉 १९६० : ठाणे
» रामचंद्र श्रीपाद जोग
〉 १९६१ : ग्वाल्हेर
» कुसुमावती देशपांडे
〉 १९६२ : सातारा
» नरहर विष्णू गाडगीळ
〉 १९६४ : मडगाव
» वि.वा.शिरवाडकर/ कुसुमाग्रज
〉 १९६५ : सातारा
» वामन लक्ष्मण कुलकर्णी
〉 १९६७ : भोपाळ
» विष्णू भिकाजी कोलते
〉 १९६९ : वर्धा
» पु.शि.रेगे
〉 १९७३ : यवतमाळ
» गजानन दिगंबर माडगूळकर
〉 १९७४ : इचलकरंजी
» पु.ल.देशपांडे
〉 १९७५ : कऱ्हाड
» दुर्गा भागवत
〉 १९७७ : पुणे
» पु.भा.भावे
〉 १९७९ : चंद्रपूर
» वामन कृष्ण चोरघडे
〉 १९८० : बार्शी
» गं.बा.सरदार
〉 १९८१ : अकोला
» गो.नी.दांडेकर
〉 १९८१ : रायपूर 【छत्तीसगड】
» गंगाधर गाडगीळ
〉 १९८३ : अंबेजोगाई
» व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
〉 १९८४ : जळगांव
» शंकर रामचंद्र खरात
〉 १९८५ : नांदेड
» शंकर बाबाजी पाटील
〉 १९८८ : मुंबई
» विश्राम बेडेकर
〉 १९८८ : ठाणे
» वसंत कानेटकर
〉 १९८९ : अमरावती
» केशव जगन्नाथ पुरोहित
〉 १९९० : पुणे
» यू.म. पठाण
〉 १९९० : रत्नागिरी
» मधू मंगेश कर्णिक
〉 १९९२ : कोल्हापूर
» रमेश मंत्री
〉 १९९३ : सातारा
» विद्याधर गोखले
〉 १९९४ : पणजी
» राम शेवाळकर
〉 १९९५ : परभणी
» नारायण सुर्वे
〉 १९९६ : आळंदी
» शांता शेळके
〉 १९९७ : अहमदनगर
» ना.सं.इनामदार
〉 १९९८ : परळी-वैजनाथ
» द.मा.मिरासदार
〉 १९९९ : मुंबई
» वसंत बापट
〉 २००० : बेळगांव
» य.दि.फडके
〉 २००१ : इंदूर
» विजया राजाध्यक्ष
〉 २००२ : पुणे
» राजेंद्र बनहट्टी
〉 २००३ : कऱ्हाड
» सुभाष भेंडे
〉 २००४ : औरंगाबाद
» रा.ग. जाधव
〉 २००५ : नाशिक
» केशव मेश्राम
〉 २००६ : सोलापूर
» मारुती चितमपल्ली
〉 २००७ : नागपूर
» अरुण साधू
〉२००८ : सांगली
» म.द. हातकणंगलेकर
〉 २००९ : महाबळेश्वर
» आनंद यादव
〉 २०१० : पुणे
» द.भि.कुलकर्णी
〉 २०१० : ठाणे
» उत्तम कांबळे
〉 २०१२ : चंद्रपूर
» वसंत आबाजी डहाके
〉 २०१३ : चिपळूण
» नागनाथ कोत्तापल्ले
〉 २०१४ : सासवड
» फ. मुं. शिंदे
〉 २०१५ : घुमान 【पंजाब】
» सदानंद मोरे
〉 २०१६ : पिंपरी-चिंचवड 【पुणे】
» श्रीपाल सबनीस
〉 २०१७ : डोंबिवली
» अक्षयकुमार काळे
〉 २०१८ : बडोदे
» लक्ष्मीकांत देशमुख
〉 २०१९ : यवतमाळ
» अरुणा ढेरे
〉 २०२० : उस्मानाबाद
» फादर फ्रान्सिस दिब्रिटो
〉 २०२१ : नाशिक
» जयंत नारळीकर
〉 २०२२ : उदगीर
» भारत सासणे
〉 २०२३ : वर्धा
» नरेंद्र चपळगावकर
मराठी साहित्य संमेलन या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!