नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते.जुन्या प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करत होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना 1982 साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र 1989 साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते.
» पूर्ण नाव
नरेंद्र अच्युत दाभोळकर
» जन्म
01 नोव्हेंबर 1945
सातारा,ब्रिटिश भारत
» मृत्यू
20 ऑगस्ट 2013
पुणे,महाराष्ट्र
गोळ्या घालून हत्या
» राष्ट्रीयत्व
भारतीय
» प्रसिद्ध काम
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना
साधना 【साप्ताहिक सुरू केले】
» पत्नी
शैला
» वडील
अच्युत दाभोळकर
» आई
ताराबाई दाभोळकर
» अपत्ये
मुक्ता दाभोळकर-पटवर्धन
डॉ. हमीद दाभोळकर (पुत्र)
» सन्मान
पद्मश्री पुरस्कार
■ जीवन
वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात लहान असून त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला.नरेंद्र दाभोलकर याचा विवाह शैला यांच्याबरोबर झाल. त्याना मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहेत. लग्न सोहळा व त्या मधील खर्च यावर ते सतत टीका करीत असत त्यामुळेच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले.
■ सामाजिक कार्य
बाबा आढाव यांच्या एक गाव एक पाणवठा या चळवळीत - दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या 1983 मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर 1989 मध्ये वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 1998 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
» अंधश्रद्धेविरोधात लढा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करून महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर खूप वर्ष कार्य केले होते. यासंदर्भात सातत्याने प्रयत्न करून विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम त्यांनी केले. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.त्यामुळे जनजागृती होण्यास खूप मदत झाली
■ साहित्य
• अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन
• अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन
• ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन
• ज्याचा त्याचा प्रश्न
【अंधश्रद्धा या विषयावरील नाटक- लेखक : अभिराम भडकमकर】
• झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
• ठरलं... डोळस व्हायचंच - मनोविकास प्रकाशन
• तिमिरातुनी तेजाकडे - राजहंस प्रकाशन
• प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे डी.व्ही.डी, निर्माते- ओपस कंपनी.
• प्रश्न मनाचे 【सहलेखक डॉ हमीद दाभोलकर】 - राजहंस प्रकाशन
• भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन
• मती भानामती - राजहंस प्रकाशन 【सहलेखक माधव बावगे】
• विचार तर कराल? - राजहंस प्रकाशन
• विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन
• श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन 【2002】
■ पुरस्कार
• अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ला दिला होता.
• समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्लब
• दादासाहेब साखवळकर पुरस्कार
• शिवछत्रपती पुरस्कार - कबड्डी
• शिवछत्रपती युवा पुरस्कार क - कबड्डी -
• पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार
【मरणोत्तर】
• भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
【मरणोत्तर】
■ दाभोलकरांच्या नावे पुरस्कार
अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने 2013 सालापासून जनहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे.
■ मृत्यू
मला माझ्याच देशात पोलीस स्वतःच्या लोकांकडून संरक्षण घ्यायचे असेल तर मला काहीतरी चुकीचे वाटते, मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे. पोलीस संरक्षण नाकारल्यावर दाभोलकर. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर अज्ञातांनी 04 गोळ्या झाडून हत्या केली.
नरेंद्र दाभोलकर यांच्या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!