महाराष्ट्राची मानचिन्हे
कोणत्याही राज्याची संस्कुती,पर्यावरण, इतिहास याचे दर्शन आपल्याला त्या राज्याच्या मानचिन्हावरून कळते. जसे भारताचे राष्ट्रीय फुल कमळ आहे.तसेच महाराष्ट्राचे राज्य मानचिन्ह आहेत. महाराष्ट्र हे पश्चिम आणि मध्य भारतातील एक राज्य आहे, ज्याने दख्खनच्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे.महाराष्ट्र भारतातील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असून आपण आज महाराष्ट्राची मानचिन्हे कोणकोणती आहेत, त्या सर्वांची यादी आणि महाराष्ट्राची मानचिन्हे या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
महाराष्ट्राच्या मानचिन्हांची यादी
List of Maharashtra State Symbol
» महाराष्ट्राचा राज्य प्राणी
शेकरू
» महाराष्ट्राचे राज्य फुल
ताम्हण किवा जारूळ
» महाराष्ट्राचा राज्य पक्षी
हरियाल
» महाराष्ट्राचा राज्य वृक्ष
आंबा
» महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू
ब्ल्यू मॉरमॉन
» महाराष्ट्राचा राज्य खेळ
कबड्डी
» महाराष्ट्राचा राज्य मासा
सिल्वर पापलेट
» महाराष्ट्राचे राज्य गीत
जय जय महाराष्ट्र माझा
» महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष
पांढरी चिप्पी
महाराष्ट्र राज्याची मानचिन्हे याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
राज्य प्राणी -:- शेकरू
महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे.
• शेकरू ज्याला सामान्यतः मलबार जायंट गिलहरी म्हणून ओळखले जाते, ही एक विशाल बहुरंगी वृक्ष गिलहरी आहे जी केवळ भारतातील जंगलात आढळते.
• भक्षकांपासून वाचण्यासाठी, शेकरू सहसा 11 मीटर उंचीच्या मोठ्या झाडांमध्ये घरटे बांधतात.
• शेकरूचे डोके आणि शरीराची लांबी 25-50 सेमी, शेपटीची लांबी समान किंवा किंचित मोठी आणि 1.5-2 किलो वजन आहे.
• यात लक्षवेधी दोन ते तीन रंगसंगती आहे.त्यामध्ये पांढरा, क्रिमी-बेज, बफ, टॅन, रस्ट, लाल-मरुण, तपकिरी, गडद सील तपकिरी आणि काळा यांचा समावेश होतो.
राज्य पक्षी -:- हरियाल
हरियाल हा एक कबूतर वंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. तो आनंद सागर, शेगाव येथे आढळतो. पाचू- कवडा या कबुतराच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीच्या झाडावर तो असतो. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. त्यांचा विणीचा हंगाम मार्च ते जून असतो.
राज्य झाड -:- आंबा
आंबा ही एक प्रसिद्ध, सदापर्णी, 15 ते 25 मीटर उंच, घेर 4 ते 5 मीटर आणि आकार घुमटासारखा असलेला वृक्ष आहे. याची साल जाड, गर्द करडी किंवा काळपट, खरबरीत, भेगाळ, खवलेदार असते. पाने साधी, कोवळेपणी लालसर, नंतर तपकिरी होतात. शेवटी ती गर्द हिरवी, लांबट भाल्यासारखी दिसतात. फुले लहान असतात, लालसर व तिखट वासाची असतात. झाडाला जानेवारी- मार्चमध्ये मोहोर येतो. नंतर मे-जूनमध्ये आंबे लागतात. आंबा भारतात अत्यंत लोकप्रिय असून जगातल्या उत्कृष्ट फळांपैकी एक आहे.
राज्य फुलपाखरू -:- ब्ल्यू मॉरमॉन
ब्ल्यू मॉरमॉन या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. ब्ल्यू मॉरमॉनचे पंख 120-150 मिमी आहेत. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात, तसेच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्रात राणी पाकोळी असेही म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळते.
राज्य फुल -:- ताम्हण
तामण हा पानझडी वृक्ष लिथ्रेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, मलेशिया या देशांत आढळतो. तामणाच्या फुलांच्या पाकळ्या चुरगळलेल्या व क्रेप कागदासारख्या दिसतात, म्हणून त्याला इंग्रजीत क्रेप फ्लॉवर असेही म्हणतात. भारतात हा वृक्ष शोभेकरिता सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या कडेला व बागेत हा सामान्यपणे आढळतो.
राज्य खेळ -:- कबड्डी
1934 मध्ये या खेळाचे नियम तयार झाले.1936 मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. 1938 पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.
महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरिता निश्चित केले होते त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळाला जाऊ लागला. पुढे कबड्डीच्या प्रचार आणि प्रसार करीता अपार कष्ट आणि मेहनत घेतल्या गेलेल्या या खेळाने देशाच्या सीमा ओलांडल्या.सध्या हा खेळ जास्त प्रसिध्द झाला आहे.
राज्य मासा -:- सिल्वर पापलेट
महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून सिल्वर पापलेट घोषित केला आहे. महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून याआधी कोणत्याही माशाच्या प्रजातीला मान्यता मिळाली नव्हती, परंतु आता सिल्वर पापलेटला मान्यता मिळाली आहे.मुळात या माशाचं नाव पॉम्प्रेट 【Pomfret】 असे आहे. मात्र, स्थानिकांकडून या माशाला पापलेट या नावाने ओळखलं जाते. पापलेट संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र तसेच गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात आढळतो. पापलेट मासा महागड्या माशांपैकी एक आहे.
राज्य गीत -:- जय जय महाराष्ट्र माझा
राज्य गीत -:- जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्य गीत म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले आहे. हे गीत लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते. हे गाणे नेहमी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर वापरले तसेच वाजवले जाते.
गीत -:- जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा... ॥१॥
गीत -:- जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा... ॥१॥
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥
गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शाहीर साबळे
राज्य कांदळवन वृक्ष -:- पांढरी चिप्पी
कांदळवने समुद्र किनाऱयांचे लाटांपासून, त्सुनामीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. अनेक समुद्र प्रजातींचे प्रजनन कांदळवन क्षेत्रात होते. कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी ‘पांढरी चिप्पी' 【सोनेरेशिया अल्बा】 या वृक्षास राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषीत करण्यात आले आहे. राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
समुद्र किनाऱयाच्या भरती आणि ओहोटीच्या मधल्या क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींना चिपीचे वन किंवा कांदळवन या नावाने ओळखले जाते. समुद्र किनाऱ्याच्या भूभागाचे तसेच तिथल्या सर्व प्रकारच्या सजीवसृष्टीचे संरक्षण आणि अस्तित्व टिकून राहण्यासाठी कांदळवने खूपच महत्वाची भूमिका बजावतात.
समुद्र किनाऱयाच्या भरती आणि ओहोटीच्या मधल्या क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींना चिपीचे वन किंवा कांदळवन या नावाने ओळखले जाते. समुद्र किनाऱ्याच्या भूभागाचे तसेच तिथल्या सर्व प्रकारच्या सजीवसृष्टीचे संरक्षण आणि अस्तित्व टिकून राहण्यासाठी कांदळवने खूपच महत्वाची भूमिका बजावतात.
वरील महाराष्ट्राची मानचिन्हे यावर आधारीत माहिती आपणास कशी वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!














Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!