◆ उप दिशा कशा लक्षात ठेवाल
【घड्याळाच्या दिशेने】
→ वानर इकडे आले नाही
» वा – वायव्य
» ई – ईशान्य
» आ – आग्नेय
» ना – नैरुत्य
◆ विषाणूंमुळे होणारे रोग लक्षात ठेवायची ट्रिक
→ कांदे पोइए गोड का रे झाले
【पोइए म्हणजेच पोहे असे समजावे】
» कां – कांजण्या
» दे – देवी
» पो – पोलिओ
» इ – इन्फुएन्झा
» ए – एड्स
» गो – गोवर.
» ड – डेंग्यू
» का – कावीळ
» रे – रेबीज
◆ जीवाणूंमुळे होणारे रोग लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
→ धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला
» धनुर्वात
» क्षयरोग
» कुष्ठरोग
» न्युमोनिया
» विषाचा = विषमज्वर
» घोट = घटसर्प
» पटकन = पटकी
गांधीजींच्या सक्रीय चळवळी क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
→ चंपाच्या खेड्यातील गिरण्यांनी संप केला म्हणून गांधीजींनी रोलेट act नुसार असहकार चळवळीच्या माध्यमातून सविनय वैयक्तिक भारत सोडण्याचा निर्णय घेतला.
» चंपारण्य सत्याग्रह – 1917
» खेडा सत्याग्रह – 1918
» अहमदाबाद गिरणी संप – 1918
» रोलेट ऍक्ट विरोधात सत्याग्रह – 1919
» असहकार चळवळ – 1920
» सविनय कायदेभंग चळवळ – 1930
» वैयक्तिक सत्याग्रह – 1940
» भारत छोडो आंदोलन – 1942
◆ दोन वेळा नोबल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
→ मॅडम आणि जॉन फ्रेडली बोलतात
» मॅडम – मॅडम क्युरी
» जॉन – जॉन बारडिन
» फ्रेंड – फ्रेंडरिक सेंगर
» ली – लिनस पोलिंग
◆ चांदीचे उत्पादक प्रमुख 04 देश उतरत्या क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
→ मी पकडला चोर
» मी – मेक्सिको
» पकडला – पेरू
» चोर – चीन
◆ सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक
→ साथ आहे मी तुझ्या
» सात – सातमाळ
» आ – अजिंठा
» हे – हरिश्चंद्र
» मी – महादेव
◆ अनुसूचित जमाती साठी राखीव महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ कसे लक्षात ठेवाल?
→ दिपाचा नंदू कोठे गेला
» दि – दिंडोरी
» पा – पालघर
» चा – चिमूर
» नंदू – नंदुरबार

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!