▪️ महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.
▪️ पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.
▪️ निवडणूक » प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
▪️ सभासदांची पात्रता »
1: तो भारताचा नागरिक असावा
2 : त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
3 : त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
▪️ आरक्षण »
1: महिलांना : 50 %
2: अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात [महिला 50%]
3: इतर मागासवर्ग : 27% [महिला 50%]
▪️ विसर्जन » राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.
▪️ कार्यकाल » 5 वर्ष
▪️ राजीनामा :
» सभापती » जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे
» उपसभापती » पंचायत समितीच्या सभापतीकडे
» त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.
▪️ मानधन :
सभापती » दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा
उपसभापती » दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा
▪️ गटविकास अधिकारी :
1: निवड » महाराष्ट्र लोकसेवा आयोग
2 : नेमणूक » राज्यशासन
3 : कर्मचारी » ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 / वर्ग-2 चा अधिकारी
4 : ल नजिकचे नियंत्रण » मुख्य कार्यकारी अधिकारी
5 : पदोन्नती » उपमुख्य कार्यकारी अधिकारी
▪️ गटविकास अधिकारी कार्य व कामे :
1 : पंचायत समितीचा सचिव
2 : शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.
3 : वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.
4 : कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.
5 : पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
6 : पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.
7 : पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.
8 : अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.
▪️ पंचायत समितीची कामे :
» शिक्षण
» कृषी
» वने
» समाजकल्याण
» पशुसंवर्धन व दुग्धविकास
» सार्वजनिक आरोग्य सेवा
» दळणवळण
» समाजशिक्षण





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!