दसरा हा हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर, देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जातो
दसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते. कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. ग्रामीण भागातील शेतकरी हा उत्सव साजरा करतात
"दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा” असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली उगीच नाही, करण त्यात फार मोठा इतिहास दडलेला आहे.
पराक्रमाचा आणि पौरूषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेले दिसतात.प्रभु रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढय शत्रुचा वध करून विजय प्राप्त केला तो याच दिवशी !
देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युध्द करून संपविले ते सुद्धा याच दिवशी! आणि त्यामुळेच त्या देवीला महिषासुरमर्दिनी असे ही म्हंटले जाऊ लागले.या आख्यायिकांचा इतिहास असल्याने बरेच मराठा व राजपुत तसेच इतर योद्धे युध्द मोहिमांचा शुभारंभ आजच्या दिवशी करत असत.
अज्ञानावर ज्ञानाने. वैऱ्यावर प्रेमाने तसेच शत्रुवर पराक्रम गाजवून विजय प्राप्त करण्याचा विजयादशमी हा दिवस अतिशय शुभ असा समजला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला हा दिवस कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो.याच दिवशी शस्त्रांची पुजा करण्याची पद्धत असून याच शुभमुहुर्तावर सरस्वती पुजन देखील केले जाते
महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपटयाची पाने दिली जातात. या दिवशी सिमोल्लंघन, सरस्वती पुजन, शमीपुजन, शस्त्रांचे पुजन आणि अपराजिता पुजन देखील केले जाते.
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा....!


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!