» महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाश्या पटेल यांची निवड झाली आहे.
» रघुबर दास यांची ओडिशा राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे.
» इंद्र सेना रेड्डी यांची त्रिपुरा राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे.
» महाराष्ट्र शासनाच्या "मागील त्याला शेततळे" या योजनेला "छत्रपती शिवाजी महाराज" नाव देण्यात आले आहे.
» केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय च्या 2022-23 आकडेवारी नुसार देशात सिक्कीम राज्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे.
» देशात दरडोई उत्पन्न मध्ये महाराष्ट्र राज्याचा 11वा क्रमांक आहे.
» भारताचे दरडोई उत्पन्न 2031 पर्यंत 4500 डॉलर होण्याचा अंदाज आहे.
» केंद्र सरकारने PMLA कायद्यात दुरुस्ती केली असून 50 हजार रुपयावरील अंतरराष्ट्रीय व्यवहाराची चौकशी होणार आहे.
» भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न GDP 5 लाख कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज डेलॉइट इंडिया ने वर्तविला आहे.
» अंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या एकदिवसीय सामन्याच्या फलंदजाच्या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये 3 भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे.
» ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट फलंदाजी च्या क्रमवारीत बाबर आझम अव्वल स्थान कायम राखले आहे.
» ICC च्या एकदिवशीय गोलंदाजाच्या रँकिंग मध्ये मोहम्मद सिराज हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे.
» महाराष्ट्र राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून सरकारी शाळेत एक राज्य एक गणवेश धोरण राबविण्यात येणार आहे.
» सिद्धार्थ मृदुल यांची मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश पदी नियुक्ती झाली आहे.
» केंद्र सरकारने 2024-25 वर्षासाठी मसूर या रब्बी हंगामातील पिकाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ केली आहे.
» महाराष्ट्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!