सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 07 डिसेंबर 2023 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यात आला.
〉 07 डिसेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस साजरा करण्यात आला.
〉 रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
〉 चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह 【BRI】 प्रकल्पातून इटली ला वगळण्यात आला.
〉 अमेरिकन पॉप सुपरस्टार 'टेलर स्विफ्ट' हिची टाईम्स मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली.
〉 गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स 【AI】 न्यूरल नेटवर्क जेमिनी एआय लाँच केले.
〉 अलीकडेच COP-28 मध्ये IIT मंडीने प्रतिष्ठित ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड जिंकला.
〉 अभिनेत्री हुमा कुरेशीने तिची पहिली कादंबरी जेबाः अन अक्सिडेंटल सुपरहिरो प्रकाशित केली.
〉 भारतीय वंशाचे समीर शाह यांची बीबीसीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 माजी भारतीय क्रिकेटपटू 'सुरेश रैना' यांची जम्मू व काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 टाटा मोटर्सने पंजाब राज्यात आपला चौथा स्क्रॅपिंग प्लांट सुरू केला.
〉 गुजरात राज्यातील गरबा नृत्याचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला.
〉 भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने मेरा गाव मेरी घरोहर हा प्रकल्प सुरू केला.
〉 नवी दिल्ली येथे 59 वा फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया वार्षिक चर्चासत्र सुरू झाले.
〉 उत्तर प्रदेश राज्य सरकारने सीएम फेलोशिप प्रोग्राम सुरू केला.
〉 केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन व इतर 3 भारतीय फोर्ब्स 2023 च्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समाविष्ट आहेत
〉 क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर सस्टेनेबिलिटी 2024 मध्ये दिल्ली विद्यापीठ 220 व्या स्थानावर असून टोरोंटो विद्यापीठ अव्वल स्थानी आहे.
〉 ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी बँक नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवासाठी एएमए बँक योजना सुरू केली
〉 गुजरात व AAI यांनी गुजरातमध्ये विमानतळ विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!