■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 आंतरराष्ट्रीय गुलामगिरी मुक्तता दिन
〉 राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.
■ 2 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉 1402
लाइपझिग विद्यापीठ सुरु झाले.
〉 1942
एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणुभट्टीत अणुविभाजनाची श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यात यश मिळवले. म्हणून अणूऊर्जेचा शोध लागला.
〉 1942
योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पाँडिचेरी येथे स्थापना झाली.
〉 1971
अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची 【UAE】 स्थापना केली.
〉 1976
फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.
〉 1988
बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेत.कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
〉 1989
भारताच्या 7व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.
〉 1999
काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे व परकीय चलन व्यवस्थापन करणारे ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
〉 2001
एराँन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
〉 1984
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस सुरू झाला
■ 02 डिसेंबर जन्म / जयंती
〉 1855
कायदेपंडित,मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म.
【मृत्यू - 14 में 1923】
〉 1885
यकृत व यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.
〉 1898
पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म.
【मृत्यू - 22 जुलै 1918】
〉 1905
सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.
〉 1937
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.
〉 1942
मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ.अनिता अवचट यांचा जन्म.
〉 1944
कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म.
【मृत्यू - 21 जानेवारी 2006】
〉 1947
भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.
〉 1959
अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.
〉 1972
भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.
■ 02 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1594
नकाशाकार,गणितज्ञ,तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन.
【जन्म - 05 मार्च 1512】
〉 1906
कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.
〉 1980
पाकिस्तानचे 4 थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन.
【जन्म - 15 जुलै 1905】
〉 1996
आंध्र प्रदेशचे 11 वे मुख्यमंत्री एम.चेन्ना रेड्डी यांचे निधन.
【जन्म - 13 जानेवाटी 1919】
〉 2014
महाराष्ट्राचे 8 वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन.
【जन्म - 09 फेब्रुवारी 1929】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!