महाराष्ट्रातील संपुर्ण 32 जिल्हा न्यायालये आणि मुंबईमधील एकूणच 03 न्यायालये यामध्ये रिक्त असणाऱ्या लघुलेखक 【Stenographer】, कनिष्ठ लिपीक 【Junior Clerk】 आणि शिपाई/हमाल 【Peon】 या एकुण 5793 पदांची भरती होणार असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि.04 डिसेंबर 2023 रोजी सुरूवात होणार आहेत.त्यामुळे उमेदवारांच्या मनात भरती प्रक्रियेचे परीक्षेचे स्वरूप कसे असेल याबाबतीत संभ्रम असेल याची माहिती आपण पहाणार आहोत.मागील जिल्हा न्यायालय भरती 2018 साली झाली होती,त्याच परीक्षेप्रमाणे लघुलेखक,कनिष्ठ लिपीक आणि शिपाई / हमाल पदांच्या भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
■ लघुलेखक 【Stenographer】
जिल्हा न्यायालय भरती लघुलेखक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेचे स्वरूप हे लघुलेखन कौशल्यावर आधारित असणार आहे. लघुलेखक या पदासाठी परीक्षा एकूण 100 गुणांची असून त्या 100 गुणांचे विभाजन हे पुढिलप्रमाणे करण्यात आले आहे.
1】 इंग्रजी लघुलेखन : 20 गुण
यामध्ये परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक हे परीक्षार्थीना 5 मिनीटे Dictation देतील ते परीक्षार्थीनी लघुलिखीत करून घ्यावे. त्यानंतर 40 मिनीटांच्या कालावधीत लघुलिखीत केलेले रूपांतरीत करून परीक्षार्थीने संगणकावर तेच टंकलिखीत 【Typing】 करायचे असते.
2】 मराठी लघुलेखन : 20 गुण
यामध्ये परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक हे परीक्षार्थीना 5 मिनीटे Dictation देतील ते परीक्षार्थीनी लघुलिखीत करून घ्यावे. त्यानंतर 35 मिनीटांच्या कालावधीत लघुलिखीत केलेले रूपांतरीत करून परीक्षार्थीने संगणकावर तेच टंकलिखीत 【Typing】 करायचे असते.
3】 इंग्रजी टंकलेखन : 20 गुण
इंग्रजी व मराठी लघुलेखनची परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इंग्रजी व मराठी टंकलेखनच्या परीक्षेकरीता बोलावण्यात येते. या परीक्षेत परीक्षार्थीना इंग्रजी भाषेतील 400 शब्दांचा उतारा देण्यात येतो. तो उतारा पाहून 10 मिनीटांच्या कालावधीमध्ये तो संगणकावर टंकलिखीत 【Typing】 करायचा असतो. हा सदर उतारा टंकलिखीत 【Typing】 करीत असताना उमेदवार हा Backspace बटणाचा उपयोग करू शकत नाही.
4】 मराठी टंकलेखन : 20 गुण
या परीक्षेत परीक्षार्थीना मराठी भाषेतील 300 शब्दांचा उतारा देण्यात येतो. तो उतारा पाहून 10 मिनीटांच्या कालावधीत संगणकावर टंकलिखीत 【Typing】 करायचा असतो. सदर उतारा उमेदवार टंकलिखीत 【Typing】करत असताना Backspace बटणाचा उपयोग करू शकत नाही.
5】 मुलाखत : 20 गुण
वरील चारही कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीमध्ये आपले शिक्षण व लघुलेखन, टंकलेखन, संगणकासंबंधी ज्ञान या कौशल्यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
अशा प्रकारे वरील प्रमाणे 3 टप्प्यांत 【इंग्रजी+मराठी लघुलेखन=टप्पा क्र.01,इंग्रजी मराठी टंकलेखन=टप्पा क्र.02,मुलाखत=टप्पा क्र.03】 एकुण 100 गुणांची लघुलेखक या पदाची परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर अंतिम निकाल जाहिर करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षायादी प्रसिध्द केली जाते.
■ कनिष्ठ लिपीक 【Junior Clerk】
जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपीक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेचे स्वरूप लेखी परीक्षा, टंकलेखन कौशल्य व मुलाखत अशा स्वरूपाचे असणार असून लिपीक पदासाठीची परीक्षा एकूण 100 गुणांची असते. त्या 100 गुणांचे विभाजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
1】 लेखी परीक्षा : 40 गुण
कनिष्ठ लिपीक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी चाचणी घेण्यात येते. या परीक्षेची काठिण्य पातळी इयत्ता बारावी पर्यंतची असते. या परीक्षेमध्ये एकुण 40 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण याप्रमाणे 40 गुणांची ही परीक्षा असते. या परीक्षेत एका प्रश्नासाठी उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात. त्यातून योग्य उत्तराच्या पर्यायासमोरील चौकोन काळ्या रंगाच्या स्केच पेनने रंगवायचा असतो. लेखी परीक्षेसाठी एकुण 60 मिनीटांचा वेळ असतो. लेखी परीक्षेकरीता पुढिलप्रमाणे अभ्यासक्रम असतो.
■ अभ्यासक्रम
» सामान्यज्ञान
राज्यशास्त्र
अर्थशास्त्र
भुगोल
इतिहास
सामान्य विज्ञान
» बुद्धिमत्ता चाचणी व गणित
» चालु घडामोडी
» मराठी
» इंग्रजी
» संगणक
2】 मराठी टंकलेखन : 20 गुण
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मराठी टंकलेखनच्या परीक्षेकरीता बोलावण्यात येते. या परीक्षेत परीक्षार्थीना मराठी भाषेतील 300 शब्दांचा उतारा देण्यात येतो. तो उतारा पाहून 10 मिनीटांच्या कालावधीत संगणकावर टंकलिखीत 【Typing】 करायचा असतो. सदर उतारा हा उमेदवार टंकलिखीत 【Typing】 करत असतो त्यावेळी Backspace बटणाचा उपयोग करता येत नाही.
3】 इंग्रजी टंकलेखन : 20 गुण
मराठी टंकलेखनची परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इंग्रजी टंकलेखनच्या परीक्षेकरीता बोलावण्यात येते. या परीक्षेत परीक्षार्थीना इंग्रजी भाषेतील 400 शब्दांचा उतारा देण्यात येतो. तो उतारा पाहून 10 मिनीटांच्या कालावधीत संगणकावर टंकलिखीत 【Typing】 करायचा असतो. सदर उतारा टंकलिखीत 【Typing】 करत असताना उमेदवांराना Backspace या बटणाचा उपयोग करता येत नाही.
04】 मुलाखत : 20 गुण
वरील चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या शिक्षणावर आधारित व टंकलेखन कौशल्यावर तसेच संगणक ज्ञान या संदर्भातील प्रश्न विचारले जातात.
अशा प्रकारे वरील प्रमाणे 3 टप्प्यांत 【लेखी परीक्षा=टप्पा क्र.01,इंग्रजी+मराठी टंकलेखन=टप्पा क्र.02,मुलाखत=टप्पा क्र.03】 एकुण 100 गुणांची लिपीक पदाची परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर अंतिम निकाल जाहिर करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षायादी प्रसिध्द केली जाते.

■ शिपाई / हमाल 【Peon】
शिपाई/हमाल भरती पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेचे स्वरूप हे लेखी परीक्षा,सफाई कौशल्य व मुलाखत अशा स्वरूपाचे असणार असून शिपाई/हमाल या पदासाठी परीक्षा ही 50 गुणांची असून त्या 50 गुणांचे विभाजन पुढिलप्रमाणे केले आहे.
1】 लेखी परीक्षा : 30 गुण
शिपाई/हमाल या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी चाचणी घेण्यात येते. या परीक्षेची काठिण्य पातळी ही दहावी (SSC level) स्वरूपाची असते. या परीक्षेमध्ये एकुण 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण याप्रमाणे 30 गुणांची ही परीक्षा असते. या परीक्षेत एका प्रश्नासाठी उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात. त्यातून योग्य उत्तराच्या पर्यायासमोरील चौकोन काळ्या रंगाच्या स्केच पेनने रंगवायचा असतो. लेखी परीक्षेसाठी एकुण 30 मिनीटांचा वेळ असतो. लेखी परीक्षेकरीता पुढिलप्रमाणे अभ्यासक्रम असतो.
2】 अभ्यासक्रम
» सामान्यज्ञान
राज्यशास्त्र
अर्थशास्त्र
भुगोल
इतिहास
सामान्य विज्ञान
» बुद्धिमत्ता चाचणी व गणित
» चालु घडामोडी
» मराठी
» इंग्रजी
3】 कौशल्य चाचणी : 10 गुण
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणीत पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीकरीता बोलावण्यात येते. यामध्ये जिल्हा न्यायालयाची इमारत स्वच्छतेचे काम या उमेदवारांना देण्यात येते. यामध्ये उमेदवार कशा प्रकारे काम करत आहे, उमेदवाराचा कामाच्या बाबतीतील प्रामाणिकपणा तसेच काम करण्याची आवड व पद्धत या सर्व गुणांचे बारकाईने निरीक्षण केले जाते व त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येतो.
4】 मुलाखत : 10 गुण
वरील चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणात पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या शिक्षणावर आधारित व व्यवहारज्ञानावर आधारित 【उदा.सध्या चालु असलेला साखरेचा दर,तेलाचा दर,भाज्यांचे दर तसेच इतर वस्तूचे दर इत्यादी.】 प्रश्न विचारले जातात.
अशा प्रकारे वरील प्रमाणे 3 टप्प्यांत एकुण 50 गुणांची शिपाई/हमाल पदाची परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर अंतिम निकाल जाहिर करण्यात येऊन निवड झालेल्या उमेदवारांची निवडयादी व प्रतिक्षायादी प्रसिध्द केली जाते.

वरील जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम या विषयी दिलेली माहिती कशी वाटली अथवा काही सुधारणा असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!

संकलन : एम.आर.डेसले

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!