इंदिरा प्रियदर्शिनी गांधी या प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या.त्याच बरोबर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला व आजपर्यंतच्या एकमेव पंतप्रधान होत्या. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या होत्या.
» जन्म
19 नोव्हेंबर 1917
मोगलसराई,ब्रिटिश भारत
» मृत्यू
31 ऑक्टोबर 1984
नवी दिल्ली, भारत
» राजकीय पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
» पिता
पंडित जवाहरलाल नेहरू
» माता
कमला नेहरू
» पती
फिरोज गांधी
» अपत्ये
राजीव गांधी व संजय गांधी
» सुना
सोनिया गांधी व मनेका गांधी
» नातू
राहुल गांधी 【राजीव पुत्र】
प्रियांका वढेरा 【राजीव पुत्री】
वरुण गांधी 【संजय पुत्र】
■ राजकीय कारकीर्द
» भारतीय पंतप्रधान
पहिला कार्यकाळ
19 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1967
» भारतीय पंतप्रधान
दुसरा कार्यकाळ
21 ऑगस्ट 1967 ते 14 मार्च 1969
» भारतीय परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
14 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1982
» भारतीय पंतप्रधान
तिसरा कार्यकाळ
09 मार्च 1984 ते 31 ऑक्टोबर 1984
■ कारकीर्द
1947 ते 1964 या नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते तसेच त्या अनेक परदेश दौऱ्यांवर नेहरूंसोबत जात असत.1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1964 मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली व माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्या बनल्या. 1966 च्या सुरुवातीला झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून जागा घेतली.
पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी तसेच सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढला.
अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी 1975 ते 1977 पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले तसेच प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले.1980 मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या.
ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी तथापी शीख राष्ट्रवाद्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या केली.
बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. 1999 मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला. 2020 मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील 100 शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला.
■ प्रारंभिक जीवन
इंदिरा गांधी यांचा जन्म इंदिरा नेहरू म्हणून 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील पंडित नेहरू हे ब्रिटीश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी गेले .वडील पंडित नेहरू राजकीय चळवळींमध्ये अनेकदा दूर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला.इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा.
■ इंदिरा फिरोज विवाह
इंदिरा गांधींनी इतक्यात लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. 1942 च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली.पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला.त्यामुळे त्यांचे 1960 मध्ये निधन झाले.
■ राजकारण प्रवास
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद :
1959 मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
माहिती व नभोवाणी मंत्री : जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
■ पंतप्रधान कारकीर्द
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर 1967 च्या निवडणुकात काँग्रेसचे 60 जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर 1969 मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली.
जुलै 1969 मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळातच बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले.
■ 1971 भारत-पाक युद्ध
1971च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र सुरू केले शेख मुजीबुर रहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर 1971 च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी मागे हटल्या नाहीत.
■ इंदिरा गांधीची हत्या
सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्याच अंगरक्षकानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्याच ब्रिटीश चित्रपट निर्माते पीटर उस्टिनोव्ह त्यांची मुलाखत घेणार होते.त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला 30 राउंड फायर केले व हल्लेखोरांनी शस्त्रे टाकली व आत्मसमर्पण केले.केहर सिंगला नंतर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.सतवंत व केहर दोघांनाही दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
■ सन्मान व गौरव
इंदिरा गांधी यांचे चित्र असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते.
【हे तिकीट सप्टेंबर 2015 ला बंद केले】
1971 मध्ये बांगलादेश मुक्ती युद्धात भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर,राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.
2011 मध्ये इंदिरा गांधींना बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील योगदानासाठी बांग्लादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला
भारताच्या सर्वात दक्षिणेकडील ठिकाणाला इंदिरा पॉइंट 【6.74678° उत्तर 93.84260° पूर्व】 हे नाव देण्यात आले.
इंदिरा आवास योजना हा ग्रामीण भागातील गरिबांसाठी केंद्र सरकारचा कमी किमतीचा गृहनिर्माण कार्यक्रम त्यांच्या नावे सुरू केला.
इंदिराजींच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ त्यांच्या नावे आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९८५ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी वार्षिक इंदिरा गांधी पुरस्कार स्थापित केला, जो इंदिराजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ दिला जातो.
■ सर्वात महान भारतीय
2012 मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या 'द ग्रेटेस्ट इंडियन' या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी 07 व्या क्रमांकावर होत्या.
इंदिरा गांधी दयानंद यांच्या विषयीची माहिती कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!