» वाक्या मधील क्रिया दर्शविणार्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो वाक्यामधील अशाच क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा»गाय दूध देते
»आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो
»मुलांनी खरे बोलावे
»आमच्या संघाचे ढाल जिंकली
●धातु
» क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला धातु असे म्हणतात
उदा दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस,
खा, पी
●धातुसाधीते/कृदंते
〉 धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्या शब्दांना धातुसाधीत किंवा कृंदते असे म्हणतात
〉 धातु साधीते वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही ते वाक्याच्या सुरूवातीला अथवा वाक्याच्या मध्ये येतात
〉 धातु साधीते नाम , विशेषण किंवा क्रिया विशेषणाचे काम करतात
〉 फक्त संयुक्त क्रियापदातच धातु साधीते क्रियापदाचे काम करते
उदा
◆क्रियापदे
» केले,करतो,बसला,लिहितो,खातो
◆धातुसाधिते
» करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना
:- धावणे आरोग्यासाठी चांगले असते
【धावणे-धातुसाधीत,असते-क्रियापद】
:- त्यांच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत
【खाणारी-विशेषण, खाणारी-धातुसाधीत,
आहेत-क्रियापद】
:- जहाज समुद्रात बुडतांना मी पाहिले
【बुडतांना- क्रियाविशेषण,बुडतांना-धातु साधीते,पाहिले–क्रियापद】
● क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार आहेत
1】 सकर्मक क्रियापद
2】 अकर्मक क्रियापद
1】 सकर्मक क्रियापद
» ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रिया पदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात
उदा»गाय दूध देते
»पक्षी मासा पकडतो
2】 अकर्मक क्रियापद
» ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते. म्हणजेच क्रिया कर्त्या पासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते त्यांना ‘अकर्मक क्रियापदे’ असे म्हणतात.
उदा:»मी रस्त्यात पडलो
» आज भाऊबीज आहे
◆व्दिकर्मक क्रियापदे
» ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात त्यास ‘व्दिकर्मक’ असे म्हणतात किंवा ज्या वाक्यातील क्रिया ही कर्त्यांकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास ‘व्दिकर्मक क्रियापद’ असे म्हणतात
उदा» आजीने नातीला गोष्ट सांगितली
【आजी-कर्ता, नातीने-अप्रत्यक्ष कर्म, गोष्ट-प्रत्यक्ष कर्म,सांगितले-व्दिकर्मक क्रियापद】
◆उभयविध क्रियापदे
» जेव्हा एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास ‘उभय विध क्रियापद’ असे म्हणतात.
उदा»त्याने घराचे दार उघडले
【सकर्मक क्रियापद】
»त्यांच्या घराचे दार उघडले
【अकर्मक क्रियापद】
◆अपूर्ण विधान क्रियापद
» जेव्हा वाक्यात क्रिया पद असूनदेखील वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तेव्हा आशा या क्रियापदास ‘अपूर्ण विधान क्रियापद’ असे म्हणतात. अशा वेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रिया-पदाव्यतिरिक्त ज्या शब्दांची गरज असते त्याला ‘विधान पूरक’ / ‘पूरक’ असे म्हणतात
उदा»राम झाला
:-राम राजा झाला 【राजा-विधानपूरक】
◆संयुक्त क्रियापद
» धातुसाधीत व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रिया पदास ‘संयुक्त क्रियापद’ असे म्हणतात मात्र दोन्ही शब्दां मधून कोणत्याही एकच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे
【धातुसाधीत+सहाय्यक क्रियापद= संयुक्त क्रियापद】
उदा
»क्रिडांगणावर मुले खेळू लागली.
【खेळू=धातुसाधीत, लागली=सहाय्यक
क्रियापद】
◆सहाय्यक क्रियापद
» जेव्हा धातुसाधीत व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातु साधीताला सहाय्य करणार्या क्रियापदाला ‘सहाय्यक क्रियापद’ असे म्हणतात
उदा» क्रीडांगणावर मुले खेळू लागली
» बाळ एवढा लाडू खाऊन टाक
◆सिद्ध क्रियापद
» जा, ये, कर, ऊठ, बस, असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू म्हणतात व या सिद्ध धातूना प्रत्यय लागून तयार होणार्या क्रियापदाला ‘सिद्ध क्रियापद’ असे म्हणतात
उदा»तो दररोज शाळेत जातो
»ती खूप अभ्यास करते





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!