〉 लष्कराचे दक्षिण व उत्तर आघाडी असे दोन विभाग पाडून कोणी लष्कर अधिक सुसज्ज बनविले.
» लॉर्ड किचनेर
〉 भारत देशाच्या भविष्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी लॉर्ड कर्झनच्या काळातील महत्त्वाची घटना कोणती.
» १९०५ बंगालची फाळणी
〉 कर्झनने केलेली बंगालची फाळणी १९११ मध्ये कोणाच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.
» लॉर्ड हार्डिंग्ज
〉 १२ डिसें १९११ ला दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगाल फाळणी रद्द केल्याची घोषणा कोणी केली?
» ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज
〉 इ.स १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या कोणत्या गव्ह.जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.
» चार्ल्स मेटकाफ
〉 “Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन कोणी केले.
ग्रोव्हर व सेठी
〉 भारत म्हणजे आशिया खंडामधील राजकीय स्तंभ असे कोण म्हंटले आहे.
» लॉर्ड कर्झन
〉 संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना कोणी केली?
» लॉर्ड कर्झन
〉 आधुनिक भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
» लॉर्ड कॉर्नवॉलिस
〉 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
» लॉर्ड कॉर्नवॉलिस
〉 २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आझाद हिंद सरकार'ची स्थापना कोठे केली.?
» शोनान (सिंगापूर)
〉 'बंदी जीवन' या पुस्तकाचेही कर्ते कोण आहेत.
» सचिंद्रनाथ संन्याल
〉 सावरकर बंधूंनी नाशिक येथे 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कधी केली?
» इ.स. १९०४
〉 १९१९ मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा संमत करण्यात आला. माँटेग्यू भारतमंत्री होते, तर चेम्सफर्ड हे काय होते.
» भारताचे व्हाइसरॉय
〉 जोसेफ मॅझिनी या इटालियन स्वातंत्र्ययोद्ध्याचे आत्मचरित्र मराठी भाषेत अनुवादित करणाऱ्या कोणी 'कमला' हे खंडकाव्यही लिहिले आहे.
» स्वा. सावरकर
〉 चौदा तत्त्वांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचे प्रतिपादन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष कोण.
» बुड्रो विल्सन
〉 २१ वर्षांनी म्हणजेच मार्च१९४० मध्ये ज.ओडवायरची लंडन येथे हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड कोणी उगविला.
» उधमसिंग
〉 डिसेंबर १९२९ मध्ये लॉर्ड आयर्विनची गाडी उडविण्याचा अयशस्वी प्रयत्न कोणी केला होता.
» चंद्रशेखर आझाद व यशपाल
〉 कोणी अमेरिकेत स्थापन केलेल्या 'गदर' पक्षाचे भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतिकारी प्रयत्नांतील स्थान महत्त्वाचे आहे.
» लाला हरदयाळ
〉 जपानमध्ये 'इंडिया इंडिपेंडन्स लीग' ची स्थापना कोणी केली.
» रासबिहारी बोस
〉 मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे कधी सुरू झाली.
» इ. स. १८७९
〉 इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना कोणी केली.
» अॅनी बेझंट
〉 स्वमी विवेकानंदांचे गुरू कोण होते.
» रामकृष्ण परमहंस
〉 कोणाच्या प्रयत्नांचे फलित म्हणून १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.
» ईश्वरचंद्र विद्यासागर
〉 १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 'फैजपूर' येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते.
» पंडित जवाहरलाल नेहरू
〉 कोणत्या वर्षी गांधीजींनी भारतात प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला.
» सन १९२०
〉 गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा कधी सुरू केला.
» १२ मार्च, १९३०
〉 १९४२ मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता ?
» शिरूभाऊ लिमये
〉 ८ ऑगस्ट, १९४२ रोजी कुठे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 'चले जाव'चा ठराव संमत केला.
» मुंबई
〉 रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या कोणाला 'आद्य क्रांतिकारक' म्हणून गौरविले जाते.
» वासुदेव बळवंत फडके
〉 राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?
» व्योमेशचंद्र बॅनर्जी
〉 "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?". "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे!" अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले.
» लोकमान्य टिळक [केसरी]
〉 राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते कोणत्या नावाने ओळखले जातात.
» लाल-बाल-पाल
〉 कोणत्या ब्रिटिश संसद सदस्याने स्विकार केला १८५७ चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता.
» बेंजामिन डिझरायली
〉 अनेकेश्वरवादाचे खंडन व एकेश्वरवादाचे समर्थन करणारा 'गिफ्ट टू मोनोथेइस्टस्' हा फारसी भाषेतील महान ग्रंथ कोणी लिहिला आहे.
» राजा राममोहन रॉय
〉 स्वामी दयानंद सरस्वती हे कोणाचे शिष्य होते.
» विरजानंद सरस्वती
〉 कोणी १८१७ मध्ये डेव्हिड हेअर यांच्या मदतीने कलकत्ता येथे 'हिंदू कॉलेज' स्थापन केले.
» राजा राममोहन रॉय
〉 दादाभाई नौरोजी, फर्दनजी व एस. एस. बंगाली आदीनी पारशी धर्मीयांमध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने १८५१ मध्ये कोणती संस्था स्थापन केली.
» रहनुमाई माजदयासन समाज
〉 राजा राममोहन रॉय यांनी मूर्तिपूजा, अनेकेश्वरवाद वगैरवर कडाडून टीका केली. त्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला.
» शांकर वेदान्त





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!