चित्तरंजन दास हे देशबंधु नावाने प्रसिद्ध - असून ते भारतीय राजनेता होते. ब्रिटिश शासन असताना त्यांनी बंगाल मध्ये स्वराज्य पार्टी स्थापन केली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा दिला.
» पूर्ण नाव
चित्तरंजन भुवनमोहन दास
कलकत्ता, ब्रिटिश भारत
» जन्म
05 नोव्हेंबर 1870
» शिक्षण
बी.ए 【1890 कलकत्ता】
बॅरिस्टर 【1892 लंडन】
» आई
निस्तारिणी देवी
» वडील
भुवनमोहन
» पत्नी
बसंती देवी
» अपत्ये
अपर्णा देवी
चिरंजन दास
कल्याणी देवी
» मृत्यू
16 जून 1925
चित्तरंजन दास यांचा संबंध सध्या बांगलादेश मध्ये असलेल्या बिक्रमपुर येथील बैद्य ब्राह्मण दास परिवाराशी आहे. ते भुवन मोहन दास यांचे पुत्र तर ब्रह्म समाज सुधारक दुर्गा मोहन दास यांचे भाचे होते. त्यांच्या भावंडात सतीश रंजन दास, सुधी रंजन दास, सरला रॉय आणि लेडी अबला बोस या आहेत.
इंग्लंड मध्ये चित्तरंजन दास यांनी शिक्षण पूर्ण करत बॅरिस्टर बनले. त्यांचे सामाजिक कार्य 1909 मध्ये सुरू झाले जेव्हा त्यांनी मागील वर्षी अलीपुर बाँब केस मध्ये अरविंद घोष हे समाविष्ट नव्हते असे म्हणत त्यांचे रक्षण केले होते. नंतर अरविंद घोष यांनी त्यांच्या भाषणात चित्तरंजन दास यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचे रक्षण केले म्हणून आभार देखील मानले होते.
बंगाल मध्ये 1919 - 1922 दरम्यान झालेल्या असहकार आंदोलनात मुख्य नेत्यांपैकी चित्तरंजन दास एक होते. त्यांनी इंग्रजांच्या कपड्याचा देखील खूप विरोध केला होता. त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी स्वतःचे युरोपियन कपडे जाळून खादीचे कपडे घालायला सुरुवात केली. एका वेळी त्यांचे कपडे पॅरिस मध्ये शिवले आणि धुतले जायचे आणि स्वतःचे कपडे कोलकात्याला पाठवण्यासाठी त्यांनी एक लौंड्रि देखील सुरू केली होती. नंतर जेव्हा दास हे स्वतंत्रता चळवळीत सहभागी झाले तेव्हा त्यांनी या सर्व सुख सुविधांचा त्याग केला.
दास यांनी फॉरवर्ड वृत्तपत्राची सुरुवात केली व पुढे त्याचेच नाव लिबर्टी टू फाईट दि ब्रिटिश राज ठेवले. जेव्हा कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनची स्थापना झाली तेव्हा दास हेच पहिले महापौर बनले. त्यांचा अहिंसा आणि न्यायालयीन कायद्यांवर पूर्णपणे विश्वास होता. त्यांना विश्वास होता की याच जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकते आणि हिंदू मुस्लिम समाजात एकता देखील आपण प्रस्थपित करू शकतो. त्यांनी पुढे 1923 मध्ये मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांच्या सोबत मिळून स्वराज्य पार्टीची स्थापना देखील केली. त्या माध्यमातून ते विचार लोकांपर्यंत पोहोचवत होते.
त्यांचे विचार आणि महानता हे त्यांचे शिष्य पुढे घेऊन गेले. सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या विचारांवर चालत होते.त्यांच्या देशप्रेमी विचारांकडे बघता त्यांना देशबंधु ही पदवी दिलेली होती. ते भारतीय समाजाशी जोडलेले होते.त्यांनी त्यांच्या असंख्य लेखांनी आणि निबंधांनी लोकांना प्रेरित केले. त्यांनी बसंती देवी 【1880-1974】 यांच्याशी विवाह केला. त्यांना अपर्णा देवी,चिरंजन दास व कल्याणी देवी ही तीन अपत्ये होती.
चित्तरंजन दास यांच्या सोबत बसंती देवी यांनी देखील स्वतंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. त्यांच्या वहिनी उर्मिला देवी या असहकार आंदोलनात 1921 मध्ये कोर्ट अरेस्ट होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. सर्वांच्या प्रति जोश आणि आकर्षण यांच्या जोरावर बसंती देवी या स्वतंत्र्य चळवळीत महत्वाचा चेहरा बनला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना आई म्हणून हाक मारत असत.
1925 मध्ये सतत काम करत राहिल्याने चित्तरंजन दास यांच्या तब्येत बिघडत होती,त्याचमुळे ते या सर्व गोष्टींपासून दूर झाले आणि त्यांनी दार्जिलिंग मधील पर्वतांमध्ये असणाऱ्या घरात राहायला सुरुवात केली. इथे महात्मा गांधी देखील त्यांना भेटायला येत असत. 16 जून 1925 मध्ये जास्त तापामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे देह हे ट्रेनने कोलकत्ता येथे आणण्यात आले व त्यांच्यावर त्याकाळातील विशेष पद्धतीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
1894 मध्ये चित्तरंजन दास हे कोलकत्ता उच्च न्यायालयात वकील बनले.
1905 मध्ये चित्तरंजन दास यांनी स्वदेशी मंडळाची स्थापना केली.
1909 मध्ये अलीपुर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांच्या वतीने त्यांनी न्यायालयात लढा दिला व घोष यांची निर्दोष सुटका केली.
1914 मध्ये त्यांनी नारायण नावाने एक बंगाली मासिक सुरू केले.
1917 मध्ये बंगाल प्रांताच्या राजकीय परिषदेत ते अध्यक्ष होते.
1921 ते 1922 या काळात अहमदाबाद येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.
चित्तरंजन दास यांनी मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांच्या सोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
फॉरवर्ड दैनिकात ते लेखन आणि प्रकाशन करत होते.
1924 मध्ये कोलकाता महापालिकेचे ते अध्यक्ष झाले होते.
महत्वाचे :- स्वतःची संपूर्ण संपत्ती त्यांनी मेडिकल कॉलेज आणि स्त्रियांच्या हॉस्पिटल साठी दान केली. त्यांची ही विशेषता त्यांना देशबंधु नावाचे हक्कदार नक्कीच बनवते.
देशबंधु चित्तरंजन दास यांच्या विषयीची माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!