| 06 नोव्हेंबर 2023 - चालू घडामोडी |
|---|
| सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी... |
| भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा पराभव करून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. |
| ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला. |
| भारत व इटलीने कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या मुक्त हालचाली सुनिश्चित करण्यासाठी गतिशीलता आणि स्थलांतर भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. |
| भूतानचे राजे 'जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारताच्या 8 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले. |
| केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 【CBSE】 'युनायटेड अरब अमिराती' मध्ये आपले प्रादेशिक प्रशासकीय कार्यालय उघडणार. |
| मनोरंजन दूरचित्रवाणी वाहिनी कलर्सने सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा प्रचार करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी करार केला. |
| दुबईत 'व्हायब्रॅंट गुजरात इंटरनॅशनल रोड शो आयोजित करण्यात आला आहे. |
| नवी दिल्लीत 'द G20 स्टैंडर्ड डायलॉग 2023' या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. |
| मुंबईत इंडियन नेव्ही सेलिंग चॅम्पियनशिप 2023' आयोजित करण्यात आली. |
| संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 【DRDO】 'प्रोजेक्ट कुशा' सुरू केला आहे. |
| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढील पाच वर्षांसाठी श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. |
| मलेशियाचे परराष्ट्र मंत्री जाम्बरी अब्दुल कादिर त्याच्या पहिल्या भारत भेटीवर दिल्लीत आले. |
| निवडणूक आयोगाने निवडणूक साक्षरतेला चालना देण्यासाठी 'शिक्षण मंत्रालया सोबत करार केला. |
| झुरिच इन्शुरन्स ग्रुप कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स'चा 51% हिस्सा घेणार आहे. |
| पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवली जाणार. |
| भारत-फ्रान्स यांनी सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये Lol वर स्वाक्षरी केली |
| 2024 मध्ये भारत जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्लीचे आयोजन करणार |
| RBI ने नॉन-कॉलेबल टीडी ऑफर करण्यासाठी किमान रक्कम रु. 15 लाखांवरून रु. 1 कोटी केली आहे. |
| AFLI ने नियमित उत्पन्न आणि सुरक्षिततेसाठी सुपर कॅश योजना सुरू केली |
| 2023 चा 5 वा बिझनेसलाइन चेंजमेकर ऑफ द इयर पुरस्कार RBI ने जिंकला तर AMUL ने आयकॉनिक चेंजमेकर पुरस्कार जिंकला |
| भारताचे सुरेंद्र कुमार अधना यांची प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील UN सल्लागार समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली. |
| आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण 55 पदके जिंकली 【21 सुवर्ण,21 रौप्य व 13 कांस्य】 |
चालू घडामोडी - 06 नोव्हेंबर 2023
0
Tags





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!