सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 स्वीडन येथे झालेल्या युरोपियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय वंशाच्या ईश्वर शर्माने सुवर्णपदक जिंकले.
〉 बिहार राज्य सरकारने 'मिशन दक्ष' सुरू केले आहे.
〉 न्यायमूर्ती विवेक चौधरी' यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
〉 उत्तर प्रदेश राज्य सरकारने अंगणवाडी केंद्रांवर 'गरम शिजवलेले जेवण योजना' सुरू केली.
〉 ख्रिस गोपालकृष्णन यांना 'ISB रिसर्च कॅटॅलिस्ट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले.
〉 विजयवाडा रेल्वे स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल कडून ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र प्लॅटिनमचे सर्वोच्च रेटिंग प्रदान करण्यात आले.
〉 श्री रॉबर्ट शेटकिंटॉन्ग यांची मोझांबिक प्रजासत्ताकात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथे 'विद्या समीक्षा केंद्र'चे उद्घाटन करण्यात आले.
〉 बीबीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या 'बीबीसी-100 महिलांच्या यादी'मध्ये चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला.
〉 नुकताच 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत 'जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात आला.
〉 उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे खादी कारीगर संमेलन 2023 आयोजित करण्यात आले.
〉 सरकारचा मोठा निर्णय ,CNG आणि PNG मध्ये बायोगॅसचं मिश्रण अनिवार्य केला.
〉 पाकिस्तानात अन्न मिळणंही कठीण, महागाईनं मोडले सर्व विक्रम; महागाई दर 40 टक्क्यांवर
〉 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जलयुक्त शिवार 2.0 योजनेला गती मिळणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
〉 गझवा-ए-हिंद' मॉड्यूल प्रकरणात NIA ची मोठी कारवाई! यूपी-गुजरातसह अनेक राज्यांमध्ये छापेमारी
〉 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत हेल्थ व वेलनेस सेंटरचे नाव बदलून आयुष्यमान आरोग्य मंदिर नाव देण्याचा निर्णय घेतला आहे?
〉 भारताचे बॅडमिंटन पटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले?
〉 देशामध्ये ग्रामीण उद्योग प्रोत्साहनात उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे?
〉 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे देण्यात येणारा 2023 चा महात्मा फुले समता पुरस्कार संजय आवटे यांना जाहीर झाला?
〉 कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावला राज्यातील दुसरे मधाचे गाव म्हणून मान मिळाला आहे?






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!