■ रक्त संबंध 【Blood Relation】 संकल्पना, ट्रिक्स, प्रश्न
जर तुम्ही जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क,नगर परिषद किंवा एम.पी.एस.सी इत्यादी परीक्षांची तयारी करत असाल तर परीक्षांमध्ये रक्त संबंध किंवा नाते संबंध 【Blood Relation】 वर काही प्रश्न विचारले जातात. या पोस्टमध्ये आपण रक्त संबंध 【Blood Relation】 ची संकल्पना, विविध नाते संबंध यादी तसेच प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ट्रिक्स, प्रश्नांचे प्रकार व काही महत्वाचे सोडवलेले प्रश्न आपण पहाणार आहोत जेणेकरून आपणांस आगामी परीक्षांसाठी रक्त संबंध टॉपिकची उत्तम तयारी होईल.
■ रक्त संबंध 【नाते संबंध】 : संकल्पना
रक्त संबंधावरील प्रश्नांमध्ये आपणांस विशिष्ट माहिती दिली जाते व त्या माहितीच्या आधारे कुटुंबातील विशिष्ट सदस्यांमधील संबंध विचारणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. असे प्रश्न सोडवण्यासाठी आपणांस प्रथम अशा प्रश्नांची संकल्पना समजून घ्यावी लागते आणि नंतर जास्त वेळ न घेता उत्तरे मिळवण्यासाठी शक्य तितके प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो.
■ रक्त संबंध / नाते संबंध म्हणजे काय?
रक्ताच्या नात्याचा अर्थ असा आहे की लोकांमधील नातेसंबंध जे त्यांच्या जन्मामुळे प्राप्त झालेले असतात. जन्मापासूनच एखादी व्यक्ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी काही ना काही नातेसंबंध सामायिक करते आणि तो संबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि विस्तारित संबंधांबद्दल देखील जाणून घेतो. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये, संबंधांची साखळी माहितीच्या स्वरूपात दिली जाते आणि त्याच माहितीच्या आधारे आपणांस साखळीतील दोन सदस्यांमधील संबंध विचारले जातात. मुळात मुख्य उद्देश म्हणजे दिलेली माहिती समजून त्या संबंधांच्या साखळीत विचारलेल्या नात्याशी संबंधित उत्तरापर्यंत आपण अचूकपणे पोहोचू शकेल अशा पद्धतीने विश्लेषण करणे गरजेचे असते.
■ विविध नाते संबंध तक्ता 【यादी】
साधारणपणे सर्व प्रकारची नाती दोन स्त्रोतांपासून सुरू होतात एक म्हणजे वडिलांकडून किंवा आईकडून आणि याच दोन आधारांवर अवलंबून, विविध संबंध नाती तयार होतात. खालील तक्त्यामध्ये आपण पुरुष तसेच महिलांचे त्यांच्या जीवनात संभाव्य नातेसंबंध नमूद केले असून आपल्याला आवश्यक असलेली मूलभूत गोष्ट म्हणजे आपण विविध नातेसंबंधांना काय म्हणतो हे आपल्याला माहित असणे आवश्यक असून हेच समजून घेण्यासाठी आपण एक तक्ता तयार केला आहे जेणेकरून प्रश्नाच्या विधानात काय विचारले आहे आणि काय दिले आहे हे समजण्यासाठी नक्कीच मदत होईल शकाल. चला तर मग पाहुया नाते संबंध तक्ता .









Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!