■ 16 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1868
लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरून त्या वायूला हे नाव देण्यात आले.
〉 1893
डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
〉 1907
ओक्लाहोमा हे अमेरिकेचे 46 वे राज्य बनले.
〉 1914
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
〉 1915
लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली.
〉 1930
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
〉 1945
युनेस्को 【UNESCO】 ची स्थापना झाली.
〉 1988
अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या..
〉 1996
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला
〉 1996
चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी.एन.शेषन यांची निवड.
〉 1997
अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
〉 2000
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर झाला.
〉 2013
24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृती जाहीर केली.
■ 16 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1836
हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म.
【मृत्यू - 20 जानेवारी 1891】
〉 1894
केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म.
【मृत्यू - 22 जानेवारी 1975】
〉 1897
भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक तज्ञ चौधरी रहमत अली यांचा जन्म.
【मृत्यू - 03 फेब्रुवारी 1951】
〉 1904
नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामंदी अझीकीवे यांचा जन्म.
【मृत्यू - 11 मे 1996】
〉 1909
भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म.
【मृत्यू - 09 जून 1982】
〉 1917
संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म.
【मृत्यू - 14 जानेवारी 1991】
〉 1927
मराठी व हिन्दी चित्रपटातील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.
〉 1928
मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म.
【मृत्यू - 29 जुलै 2006】
〉 1930
इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म.
【मृत्यू - 11 जून 1997】
〉 1963
अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.
〉 1968
भारतीय राजकारणी शोभाजी रेंगी यांचा जन्म.
【मृत्यू - 24 एप्रिल 2014】
〉 1973
बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.
■ 16 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1915
गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आले.
〉 1947
व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन.
【जन्म - 19 नोव्हेंबर 1877】
〉 1950
अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे एक संस्थापक डॉ.बॉब स्मिथ यांचे निधन.
【जन्म - 08 ऑगस्ट 1879】
〉 1960
अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन.
【जन्म - 1 फेब्रुवारी 1901】
〉 1967
संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन.
【जन्म - 14 जुलै 1917】
〉 2006
नोबेल विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन
【जन्म - 31 जुलै 1912】
〉 2015
प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!