◆ केंद्र सरकारने एक देश एक निवडणूकीसाठी 08 सदस्यीय पॅनेलची घोषणा केली
◆ केंद्र सरकारने नेमलेल्या या 08 सदस्यीय पॅनेल / समितीमध्ये 01 अध्यक्ष आणि 07 सदस्य असतील.
◆ 08 सदस्य खालीलप्रमाणे असतील
» रामनाथ कोविंद
भारताचे माजी राष्ट्रपती
» अमित शहा
विद्यमान केंद्रीय गृहमंत्री
» अधीर रंजन चौधरी
लोकसभा खासदार - राष्ट्रीय काँग्रेस
» गुलाम नबी आझाद
राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते
» हरीश साळवे
कायदेतज्ज्ञ
» संजय कोठारी
माजी मुख्य दक्षता आयुक्त
» एनके सिंह
वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष
» सुभाष सी कश्यप
लोकसभेचे माजी सरचिटणीस
■ महत्वपूर्ण
» काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मात्र समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला असून तसे पत्र त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे
» विधी आयोगाच्या शिफारशींनुसार एकाचवेळी निवडणुका घ्यायच्या असतील तर किमान 05 घटनादुरुस्ती आवश्यक आहेत
◆ घटनादुरुस्ती आवश्यक असणारी कलमे
» कलम 83
» कलम 85
» कलम 172
» कलम 174
» कलम 356
◆ यापूर्वी एक देश एक निवणूक भारतात 1951 ते 1967 या काळात केंद्र आणि राज्यांसाठी एकाचवेळी झाली होती.
◆ परंतु काही राज्यांच्या विधानसभा अकाली विसर्जित झाल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र घेणे क्रमप्राप्त झाले आहे.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!