चालते बोलते गणित यंत्र म्हणजेच शकुंतलादेवी होय.शकुंतला देवी या मानवी संगणक म्हणून देखील प्रसिध्द होत्या.
» जन्म
04 नोव्हेंबर 1929
बंगलोर , ब्रिटिश भारत
» मृत्यू
21 एप्रिल 2013
बंगलोर , भारत
» राष्ट्रीयत्व
भारतीय
» पती
परितोष बॅनर्जी
04 नोव्हेंबर 1929 बंगलोरमध्ये शकुंतलादेवी यांचा जन्म झाला.शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले, त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या व्यवसायाला व मंदिरातील पुजारी होण्यास नकार देऊन सर्कस मधील आडवाटेवरची नोकरी धरली.
शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांना शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख दिसली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या 06 व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.
शकुंतला देवी 1944 मध्ये लंडनला गेल्या . लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला तसेच आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. 1976 मध्ये आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली.
1977 मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद कॉम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका 201 अंकी संख्येचे 23 वे मूळ फक्त 50 सेकंदात काढून फळ्यावर लिहिले होते परंतु हेच मूळ काढायला कॉम्प्यूटरला 62 सेकंद लागले.
18 जून 1980 मध्ये त्यांना 7686369774870 आणि 2465099745779 या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते. शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ 28 सेकंदामध्ये 18947668177995426462773730 हे उत्तर दिले होते. 13 आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त 28 सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाले.
शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली. गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.
भारतात परतल्यावर 1988 मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिीर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचे विशेष आमंत्रण आले. या विभागातील प्रा. आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा. आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येच घनमूळ काढणे किवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा 7 वा किंवा 8 वा घात काढायला सांगितले तोच शकुंतला देवी यांचे उत्तर तयार असायचे.
2013 च्या एप्रिल महिन्यात वयाच्या 83 व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या जगप्रसिद्ध अशा ह्युमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड झाल्या.
ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवी यांच्या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!
शकुंतला देवी - मानवी संगणक
0
Tags





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!