सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
11 डिसेंबर 2023 रोजी जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आला
12 डिसेंबर रोजी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिन साजरा केला जातो
〉 नुकतेच डॉ.मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले.
〉 प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते 'कबीर बेदी' यांना इटलीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक' ने सन्मानित करण्यात आले.
〉 नुकत्याच जाहीर झालेल्या स्टार्टअप फंडिंग जागतिक क्रमवारीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे.
〉 भारत चार दिवसीय 27 व्या WAIPA जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करणार आहे.
〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'Developed India @2047: Voice of Youth' उपक्रम सुरू केला आहे.
〉 फ्रान्समध्ये तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ थिरुवल्लुवर' यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
〉 11 डिसेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करण्यात आला.
〉 मेघालय राज्यामधील लकडोंग हळदीला GI टॅग मिळाला आहे.
〉 पूर्व प्रादेशिक परिषदेची 26 वी बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आली.
〉 वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू जो सोलोमन यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.
〉 अलीकडेच ITC लिमिटेड ही जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली.
〉 सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.
〉 नागालँडमध्ये 14 व्या हॉर्नबिल महोत्सवाची सांगता झाली
〉 2024 मध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होणार आहे?
〉 केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत देशातील 58 विमानतळाचा सामावेश करण्यात आला आहे?
〉 केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत महाराष्ट्रातील 02 विमानतळाचा सामावेश करण्यात आला आहे?
〉 महाराष्ट्रातील पुणे व नाशिक या दोन विमानतळाचा कृषी उड्डाण 2.0 योजनेत सामावेश करण्यात आला आहे?
〉 भारत आणि व्हिएतनाम या दोन देशात विनबक्स 2023 हा युद्ध सराव हनोई शहरात सुरू आहे?
〉 2024 च्या Artificial Intelligence जागतिक भागीदारी परिषदेचे नेतृत्व भारत करत आहे?
〉 25 देशांच्या 56 सौंदर्यवतींवर मात करत भारतीय वंशाची रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023'चा मान पटकावला आहे.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!