सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय घोडा दिवस साजरा केला जातो.
〉〉 भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी गुवाहाटी मास्टर्स 2023 बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
〉〉 हवामान बदल निर्देशांक 2023 च्या 57 देशाच्या यादीत भारताचा सातवा क्रमांक आहे?
〉〉 हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये डेन्मार्क प्रथम क्रमांकावर आहे?
〉〉 आसियान महिला शांतीरक्षकांसाठी भारतीय लष्कराकडून टेबल-टॉप प्रैक्टिस 【TTX】 आयोजित करण्यात आली.
〉〉 युनेस्कोने रमजानमधील इफ्तार जेवणाची परंपरा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून समाविष्ट केली.
〉〉 "यादीं, यादें और यादें" या उत्कृष्ट हिंदी साहित्यकृतीसाठी 33 व्या व्यास सन्मान पुरस्कार, 2023 साठी पुष्पा भारती यांची निवड करण्यात आली?
〉〉 नुकतेच डोनाल्ड टस्क यांची पोलंडचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
〉〉 ऑस्ट्रेलियन फलंदाज 'ट्रॅव्हिस हेड'ची 'आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ 【नोव्हेंबर 2023】 म्हणून निवड झाली
〉〉 डॉ.अतुल शाह यांना COP 28 समिटमध्ये गेम चेंजिंग इनोव्हेटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
〉〉 नुकताच भारतीय हवाई दलाने 【IAF】 मुंबईत द्विवार्षिक प्रस्थान सराव पूर्ण केला.
〉〉 नुकतीच पाकिस्तानी क्रिकेटर असद शफीक याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.
〉〉 बँक ऑफ इंडिया 【BOI] ने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केले.
〉〉 रेज पॉवर इन्फ्रा'कडून 'उत्तराखंड' राज्यात 500 मेगावॅटचा सोलर पार्क बांधण्यात येणार आहे.
〉〉 नुकतेच रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या नवीन दोन पाणबुड्यांचे अनावरण केले.
〉〉 कारगिल विजयाच्या स्मरणार्थ, भारतीय सैन्याने नवी दिल्ली येथे ऑनर रन इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉन आयोजित केली.
〉〉 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे नियुक्ती करण्यात आली?
〉〉 गेल्या 25 वर्षात विराट कोहली या क्रिकेट पटूला गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले?
〉〉 2023 या वर्षात गूगलवर शुभमन गिल या खेळाडूला सर्वाधिक सर्च करण्यात आले?
〉〉 भारतीय अंतराळ संस्था इस्रो 2024 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार असल्याची माहिती एस.सोमनाथ यांनी दिली?






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!