■ 01 जानेवारी महत्वाच्या घटना
〉 1756
निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
〉 1808
अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
〉 1818
भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्ताखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला.
〉 1842
बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
〉 1848
महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
〉 1862
इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
〉 1880
विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
〉 1883
नूतन मराठी विद्यालयाची पुणे येथे स्थापना.
〉 1899
क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
〉 1900
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा संघटना स्थापना केली.
〉 1908
संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळीत ललित कलादर्श नाटक कंपनी सुरू केली.
〉 1919
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
〉 1923
चित्तरंजन दास व सहकाऱ्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
〉 1932
डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
〉 1995
WTO ची स्थापना करण्यात आली.
■ 01 जानेवारी जन्म / जयंती
〉 1662
पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.
【मृत्यू - 12 एप्रिल 1720】
〉 1879
ब्रिटिश साहित्यिक इ.एम.फोर्स्टर यांचा जन्म.
【मृत्यू - 07 जून 1970】
〉 1892
स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म.
【मृत्यू - 15 ऑगस्ट 1942 】
〉 1894
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म.
【मृत्यू - 04 फेब्रुवारी 1974】
〉 1900
आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म.
【मृत्यू - 14 फेब्रुवारी 1974】
〉 1902
भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म.
【मृत्यू - 06 डिसेंबर 1971】
〉 1918
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म.
【मृत्यू - 09 ऑगस्ट 2002】
〉 1923
अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म.
【मृत्यू - 24 नोव्हेंबर 2003】
〉 1928
लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.
【मृत्यू - 22 मे 1998】
〉 1936
साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म.
【मृत्यू - 21 जुलै 1997】
〉 1941
चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.
〉 1943
शास्त्रज्ञ,वैज्ञानिक,पद्मश्री,पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
〉 1950
भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.
〉 1951
अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.
■ 01 जानेवारी मृत्यू / पुण्यतिथी
〉 1515
फ्रान्सचा राजा लुई 【बारावा】 यांचे निधन.
【जन्म - 27 जून 1462】
〉 1748
स्विस गणितज्ञ जोहान बनोली यांचे निधन.
〉 1894
जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्टझ यांचे निधन.
【जन्म - 22 फेब्रुवारी 1857】
〉 1944
दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन.
【जन्म - 29 मार्च 1869】
〉 1955
भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.
〉 1975
साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन.
【जन्म - 08 ऑक्टोबर 1891】
〉 1989
समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.
〉 2009
संगीतकार व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन.
【जन्म - 11 ऑगस्ट 1928】
| 🙋♂ जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या तसेच काही विशेष घटना |
|---|
|
👉 लोकमान्य टिळकांनी पुणे येथे केसरी वृत्तपत्र सुरू केले. दि.4 जानेवारी 1881 |
|
👉 मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म. जन्म - 06 जानेवारी 1812 - मृत्यू - 18 मे 1846 |
| 👉 महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल 09 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. दि.09 जानेवारी 2002 |
| 👉 भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. निधन - 01 जानेवारी 1966 - जन्म - 02 ऑक्टोबर 1904 |
| 👉 राजमाता जिजाऊ यांचा जन्म. जन्म - 12 जानेवारी 1598 - निधन - 17 जून 1874 |
| 👉 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म. जन्म - 18 जानेवारी 1842 - निधन - 16 जानेवारी 1909 |
| 👉 आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करून अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट 【सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र】 या संस्थेची स्थापना करण्यात आली. दि.20 जानेवारी 1957 |
| 👉 मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. दि.21 जानेवारी 1972 |
|
👉 नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. जन्म - 23 जानेवारी 1887 - मृत्यू: 18 ऑगस्ट 1945 फोर्मोसा, तैवान |
| 👉 भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला. दि.26 जानेवारी 1950 |
| 👉 स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म. जन्म - 28 जानेवारी 1865 - निधन - 17 नोव्हेंबर 1928 |
| 👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या. निधन - 30 जानेवारी 1948 - जन्म: 2 ऑक्टोबर 1869 |
| 👉 WTO ची स्थापना झाली. दि.01 जानेवारी 1995 |
| 👉 नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनीला प्रयाण. दि.17 जानेवारी 1941 |
| 👉 भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली. दि.24 जानेवारी 1950 |
| 👉 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. दि.31 जानेवारी 1992 |






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!