सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 04 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.
〉〉 भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
〉〉 उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या हस्ते 9 अतुल्य वर्ष हरियाणा सरकार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
〉〉 प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक श्री साधू मेहर यांचे निधन झाले.
〉〉 झारखंड राज्यात पूर्व क्षेत्र कृषी मेळा 2024 सुरू झाला आहे.
〉〉 अभिनेता रणवीर सिंग बोट 【boat】 चा नवा बँड अॅम्बेसेडर बनला आहे
〉〉 युनिफाइड पेमेंट इंटरफेस 【UPI】 औपचारिकपणे फ्रान्समध्ये लॉंच करण्यात आला आहे.
〉〉 पुलित्झर पारितोषिक विजेते व मूळ अमेरिकन साहित्यिक एन.स्कॉट मोमाडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
〉〉 कर्नाटक राज्याने AIGDF च्या सहकार्याने डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला आहे.
〉〉 न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई उत्तराखंड समान नागरी संहिता समितीच्या अध्यक्षा झाल्या आहेत.
〉〉 गुजरातमधील सुरत विमानतळाला भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे.
〉〉 निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पात 9-14 वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस घोषित केली.
〉〉 भारत, ओमान यांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
〉〉 बेलारूसच्या अरिना साबलेन्का हिने 2024 ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
〉〉 कोटेश्वर 【कोरी खाडी】 कच्छ, गुजरात येथे समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय परिषद झाली.
〉〉 कैरो येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक 2024 मध्ये रिदम सागवान व सोनम उत्तम या जोडीने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले
〉〉 फायलोरिया निर्मूलनाचे केंद्र सरकारचे लक्ष 2027 मध्ये संपुष्टात येईल.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!