सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 08 फेब्रुवारी रोजी सेफर इंटरनेट डे 2024 साजरा केला जातो.
〉〉 पाच दिवसीय वर्ल्ड डिफेन्स शो 2024 रियाधमध्ये संपन्न झाला.
〉〉 गुजरात सरकारने 06 वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीता' या मूल्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
〉〉 उत्तराखंड राज्यात समान नागरी संहिता 【यूसीसी] विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
〉〉 भारतीय मुत्सद्दी इंद्रमणी पांडे यांनी BIMSTEC चे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला आहे.
〉〉 भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ICC कसोटी क्रमवारीत 2024 मध्ये अव्वल स्थान पटकावले.
〉〉 जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट 2023 नुसार, भारत 38 व्या क्रमांकावर आहे.
〉〉 मायक्रोसॉफ्ट कंपनी 2025 पर्यंत 20 लाखांहून अधिक भारतीयांना एआय कौशल्यांमध्ये सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहे.
〉〉 दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयाने 【आयपी कॉलेज] आपला शताब्दी सोहळा साजरा केला.
〉〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वी विज्ञान योजनेचे अनावरण केले.
〉〉 केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी IIIT-दिल्ली येथे डिजिटल इंडिया फ्यूचरलॅब्सचे उद्घाटन केले
〉〉 LIC ने वैयक्तिक जीवन विमा योजना इंडेक्स प्लस लाँच केली
〉〉 ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी श्री जगन्नाथा,लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स या शीर्षकाच्या कॉफी-टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले
〉〉 केरळचे अर्थमंत्री के.एन बालगोपाल यांनी FY2024-25 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला
〉〉 इराणने भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त सेवा जाहीर केली असून ही सेवा फक्त पर्यटनासाठी मंजूर करण्यात आली आहे.
〉〉 राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ 【NDFDC】 अंतर्गत आगरतळा येथे दिव्य कला मेळा 2024 आयोजित करण्यात आला.
〉〉 उत्तर प्रदेश सरकार राज्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी EV Upyog पोर्टल विकसित केले.
〉〉 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍरॉन फिंचने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
〉〉 गांधीजीना समर्पित देशातील पहिला तांब्यापासून बनवलेला बापू टॉवर पाटणा येथे बांधण्यात आला आहे.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!