![]() |
मराठा साम्राज्य - Maratha Empire |
मराठा साम्राज्य 【Maratha Empire】
मराठा साम्राज्य 18 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आधुनिक भारताच्या मोठ्या भागावर वर्चस्व गाजवत होते. मराठे हा पश्चिम दख्खनच्या पठारावरील 【सध्याचा महाराष्ट्र】 मराठी योद्धे गट होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. 1674 मध्ये मराठा राजवटीची सुरुवात झाली. हिंदूस्थानच्या इतिहासात हा कालखंड मराठी सत्तेच्या उत्कर्षाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. मराठा साम्राज्याने दक्षिण आशियाचा एक तृतीयांश भाग व्यापला होता.
मराठा साम्राज्याचा इतिहास
इ.स 1627 दरम्यान संपुर्ण भारतावर मुघलांचे अधिपत्य होते. उत्तरेला शहाजहान, विजापुरला मोहम्मद आदिल शहा आणि गोवळकोंडयाला सुलतान अब्दुल्ला कुतुबशहा यांचे शासन होते. समुद्र किनारे पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. त्यांत अनेक मराठी सरदार नोकरीस होते. अशा वेळी सतराव्या शतकाच्या मध्याला छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेचा प्रांरभ केला आणि आदिलशाह व मुघल इत्यादींना आपल्या पराक्रमाने जेरीस आणले. महाराष्ट्रातील कोकणकिनारपट्टी व इतर प्रदेश जिंकून त्यांनी अनेक किल्ले घेतले, काही नवीन बांधले आणि पुढे त्यांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली व स्वतःस 6 जून 1674 रोजी स्वतंत्र राजा म्हणून राज्यभिषेक करून घेतला. प्रशासनाच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमून राज्यव्यवहाराचे नियम तयार केले. गड, कोट, आरमार, पायदळ, घोडदळ वगैरेंसंबंधी शिस्तीचे घरे बांधून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करून कार्यक्षम प्रशासन तसेच शक्तिशाली शासन निर्माण करून महाराष्ट्रात मराठी सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी राज्याचा विस्तार झाला आणि शासनाला स्थिरता आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युसमयी 【4 एप्रिल 1680】 मराठी राज्यात पुढील प्रदेश अंतर्भूत होतेः जुन्नरच्या दक्षिणेकडील मावळ व खोरी, वाई, सातारा, पन्हाळा, दक्षिण कोकण, बागलाण, त्र्यंबक, उत्तर कर्नाटकाचा काही भाग, कोला, कोप्पळ, वेल्लोर, जिंजी इत्यादी. त्यांच्या ताब्यांतील किल्ल्यांची संख्या सुमारे 300 होती.
मराठा साम्राज्याचा नकाशा
भरभराटीच्या काळात या साम्राज्याच्या विविध प्रांतांमध्ये 250 दशलक्ष एकर 【1 दशलक्ष किमी वर्ग】 भागाचा समावेश होता. खाली मराठा साम्राज्याचा नकाशा पहा
मराठा साम्राज्य शासक
Maratha Empire Kings
• छत्रपती शिवाजी महाराज - 1630-1680
• छत्रपती संभाजी महाराज - 1657-1689
• छत्रपती राजाराम महाराज - 1670-1700
• महाराणी ताराबाई 【छत्रपती राजारामांची पत्नी】
• महाराज छत्रपती शाहू -उर्फ शिवाजी दुसरा
【छ. संभाजी राजांचा मुलगा】
• महाराज छत्रपती रामराजा
【नाममात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती राजाराम-राणी ताराबाई यांचा मुलगा】
• महाराज छत्रपती संभाजी महाराज
【राजारामाच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा】
• कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू चतुर्थ
मराठा साम्राज्याची वंशावळ
मराठा साम्राज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आठ पत्नी होत्या. त्यांची पहीली पत्नी म्हणजे सगुणाबाई या होत्या. यांचे शिर्के घराणे होते. त्यांना राजकवर नावाची एक कन्या होती. तसेच तिचे लग्न गणोजी शिर्के यांच्याशी झाले.
दुसरी पत्नी सईबाई ह्या नाईक-निंबाळकर यांच्या कन्या होत्या. तसेच त्यांना धर्मवीर संभाजी राजे हा पुत्र होता व सखुबाई व इतर दोन नावाच्या मुली होत्या. त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई होते. ही हंबीरराव मोहिते यांची बहीण होती, तसेच त्यांना एक पुत्र राजाराम व एक कन्या बळीबाई होती. मराठा
साम्राज्याची वंशावळ 【Maratha Empire Family】

छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान भारतीय राजा होते. ज्यांनी 1674 मध्ये पश्चिम भारतामध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मोगल सम्राट औरंगजेब याच्याशी युद्ध करावे लागले तसेच विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रज यांच्याशी देखील युद्ध करावे लागले. 1674 मध्ये महाराजांवर रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध प्रशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक कार्यक्षम पुरोगामी प्रशासन निर्माण केले. त्यांनी युद्ध कलेत अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या त्याचप्रमाणे गनिमी युद्धांची एक नवीन शैली विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि शिष्टाचार पुनरुज्जीवित केले.
छत्रपती संभाजी महाराज

शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते संभाजी आणि राजाराम. थोरला मुलगा संभाजी दरबारी लोकांमध्ये खूप लोकप्रिय होता. एक सक्षम राजकारणी आणि महान योद्धा असण्यासोबतच ते कवी देखील होते. 1681 मध्ये, संभाजींनी स्वतःचा राज्याभिषेक करून वडिलांची विस्तारवादी धोरणे पुन्हा सुरू केली. संभाजी महाराजांनी यापूर्वी पोर्तुगीज आणि म्हैसूरच्या चिक्का देवरायाचा पराभव केला होता.कोणतीही राजपूत-मराठा युती, तसेच सर्व दख्खन सल्तनत नष्ट करण्यासाठी, मुघल सम्राट औरंगजेब स्वतः 1682 मध्ये दक्षिणेकडे निघाला. त्याच्या संपूर्ण शाही दरबार, प्रशासन आणि सुमारे 400,000 सैन्यासह त्याने बिजापूर सल्तनतेवर विजय मिळवला. त्यानंतरच्या आठ वर्षात संभाजी महाराजांनी मराठ्यांचे नेतृत्व केले, औरंगजेबाकडून कधीही लढाई किंवा किल्ला गमावला नाही. औरंगजेब जवळजवळ युद्ध हरला होता. तथापि, 1689 मध्ये संभाजीचा विश्वासघाताने औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले.
राजाराम आणि ताराबाई
संभाजीराजांच्या मागून त्यांचे सावत्र बंधू राजाराम महाराष्ट्राचे छत्रपती झाले. त्यांना पकडण्याचा औरंगजबाने घाट घातला. मुघल सेनापती झुल्फिकारखान ह्याने राजधानी रायगडला वेढा घालून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला व संभाजीराजांची राणी येसूबाई, राजपुत्र शाहू इत्यादींना कैद केले. तत्पूर्वी राजाराम महाराज तेथून निसटून जिंजीस गेले आणि तेथून मराठी राज्याचा कारभार पाहू लागले. हे पाहून मुघलांनी राजाराम महाराजांस पकडण्यासाठी जिंजीच्या किल्ल्यास वेढा घातला. तो वेढा सात वर्षे चालला. त्यावेळी संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण सचिव इ. मराठी राज्याच्या धुरिंधरांनी महाराष्ट्रात तसेच दक्षिणेत वायुवेगाने सैनिकी मोहिमा काढून मुघल फौजेस जेरीस आणले. जिंजीच्या पाडावापूर्वीच 1698 मध्ये राजाराम महाराज महाराष्ट्रात आले होते. त्यामुळे मराठ्यांस जोम चढून त्यांनी मुघलांकडून बराच मुलूख पुन्हा जिंकून घेतला. राजाराम महाराज 2 मार्च 1700 रोजी सिंहगडावर मृत्यू पावले. त्यांच्या पश्चात महाराणी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून त्याच्या नावे राज्यकारभार सुरू केला आणि मुघलांशी चाललेला लढा जुन्या सरदारांच्या मदतीने नेटाने चालविला. औरंगजेब अहमदनगरजवळ भिंगार येथे दारूण निराशेत मरण पावला 【3 मार्च 1707】. त्या बरोबर मराठ्यांचे मुघलांबरोबरचे स्वातंत्र्य युद्ध संपले. मुघल फौजा उत्तरेस परतल्या. दक्षिणेत औरंगजेबचा पुत्र आझमशाह याने आपल्या कैदेत असलेला संभाजी महाराजांचा पुत्र शाहूराजा याच्याशी आवश्यकतेप्रमाणे मुघलांना मदत करण्याचा करार करून त्याची सुटका केली, याच करारावर ताराबाई मुघलांशी सख्य करण्यास तयार झाल्या होत्या, पण त्यांचे म्हणणे मान्य न झाल्याने महाराष्ट्रात पुढे 24 वर्षे यादवी युद्ध चालू राहिले.
छत्रपती शाहू महाराज
1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, छत्रपती संभाजीचा मुलगा शाहूजीला पुढचा मुघल सम्राट बहादूर शाह याने सोडले. त्याने ताबडतोब मराठा गादीवर दावा केला आणि त्याची चुलती ताराबाई आणि तिच्या मुलाला आव्हान दिले. सातारा आणि कोल्हापूर ही राज्ये 1707 मध्ये अस्तित्वात आली, कारण मराठा राजवटीच्या वारसाहक्कावरून. 1710 पर्यंत, दोन स्वतंत्र रियासत एक स्थापित वस्तुस्थिती बनली, अखेरीस 1731 मध्ये वारणा कराराने पुष्टी केली.
मराठा साम्राज्याचे प्रशासन
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः मोगल, कुतुबशाही व आदिलशाही यांची सत्ता झुगारून स्वराज्य स्थापिले. तेव्हापासून शाहूकाळाच्या सुरूवातीपर्यंत मराठ्यांचे सार्वभौम राज्य एका छत्रपतीच्या आधिपत्याखाली राहिले. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाळाजी विश्वनाथ याने मोठ्या हिंमतीने शाहू महाराजांची बाजू पक्की करून व विशेष कराराने मोगलांना मदत करण्याचे मान्य करून, त्या मोबदल्यात बादशाहाकडून अधिकृत रीत्या स्वराज्य व दक्षिणी सहा सुम्यांवर चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा 1799 मध्ये मिळविल्या.
शिवपुर्व काळात घाटगे,निंबाळकर,घोरपडे सांवतवाडीकर भोसले इ. मराठी देशमुख घराणी महाराष्ट्रात होती. सरकारने ठरविलेला दस्त वसूल करण्याचा व आपली मेहनत म्हणून त्या महसूलाचा काही ठरलेला हिस्सा स्वतःस राखून बाकी सरकारी तिजोरीत जमा करावयाचा, हे त्यांचे एक काम व आपल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था राखणे हे दुसरे काम होते.
शिवाजी महाराजांची अष्टप्रधान परंपरा सामान्यतः शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत टिकून होती. कालमानाप्रमाणे राणी येसूबाईकडे अंतर्गत राज्यव्यवस्थेसाठी जे प्रतिनिधित्व निर्माण केले होते, ते राजारामाच्या कारकीर्दीत प्रल्हाद निराजीस दिले. यामुळे पूर्वीच्या अष्टप्रधानांत प्रतिनिधिपदाची भर पडली. राजाराम जिंजीकडे गेल्यावर राजमंडळातर्फे कारभार करण्याची प्रथा पडली. राजारामाच्या कारकीर्दीत दोन राजमंडळे काम करीत होती. एक जिंजीस व दुसरे पन्हाळगडी. जे प्रधान जिंजीच्या राजमंडळावर हजर नसत, त्या ठिकाणी त्यांचे जागी त्यांचे कारभारी प्रतिनिधितिव करीत. महाराष्ट्रातील राजमंडळावर तेथील प्रधानांच्या सुभ्यावरील अंमलदार सभासद म्हणून हजर राहून काम विल्हेस लावीत. राजाराम परत आल्यावरही राजमंडळाचा कारभार चालूच राहिला. तो पुढे शाहूच्या कारकीर्दीतही चालू होता.
राजाराम जिंजीस गेल्यावर त्याने आपले सल्लागार व हितचिंतक यांच्याशी विचारविनियम केला व मोगलांच्या ताब्यातील मुलखातून राज्यासाठी चौथ-सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा (अधिकारपत्रे) निरनिराळ्या मराठे सरदारांना दिल्या. परसोजी भोसले यास गोंडवन व वऱ्हाड, निंबाळकरांना गंगथडी, यांना गुजरात व खानदेश आणि काही सरदारांना कर्नाटकाच्या चौथ-सरदेशमुखी वसुलीच्या सनदा दिल्या. तसेच महाराष्ट्रात आल्यावर 1699 साली राजारामाने उत्तरेच्या चार प्रांतांतील चौथ- सरदेशमुखी वसुलीसाठी आपल्या चार सरदारांना सनदा दिल्या. तसेच पराक्रमी सरदारांना जहागिरी मुलूख इनाम देण्याची प्रथा सुरू केली. ही पद्धत शाहू दक्षिणेत येऊन साताऱ्यास गादी स्थापन केल्यावरही चालू राहिली.
मराठा साम्राज्याचा वारसा
मराठा साम्राज्याने भारतास खूप मोठा वारसा प्रदान केला आहे. त्यातील काही प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे.
सैनिकी व्यवस्था
सैन्य हा राज्याचा तिसरा मुख्य घटक होता. शिवकालीन राज्यव्यवस्थेतील लष्करी विभागात पायदळ, घोडदळ खाशा स्वारीबरोबर असणारे लोक, स्वराज्यातील किल्ल्यांचा बंदोबस्त, किल्ल्यातील मेटे, पहारे व त्यांच्या घेऱ्यांचा बंदोबस्त, तोफखाना आणि आरमार यांचा प्रामुख्याने समावेश होई. शिपायास व नायकास दरमहा एक, दोन किंवा तीन होन वेतन असे. जुमलेदारास शंभर होन, हजारी सरदार पाचशे होन तैनात असे. पांचहजारीस सालिना अडीच हजार होन तैनात असून शिवाय त्याला सरकारकडून पालखी, अबदागीर वगैरेंची नेमणूक असे.
घोडदळात वारगीर व शिलेदार असे दोन प्रकार असत. बारगिराचा घोडा आणि हत्यारादी सामान सरकारी असत आणि सरकारमार्फत त्यांची देखभाल होई. शिलेदार स्वतः च घोडे व हत्यारे आणीत. त्यांची निगा ते स्वतःच राखीत. हत्यारे व सामान त्यांचे स्वतःचेच असे. त्यांची घोडी, हत्यारे, शरीर इत्यादींची तपासणी होई. त्यास सरकारकडून वेतन मिळे.
पायदळात दहा माणसांचा एक दहिजा केलेला असे, त्यावर एक नाईक मुख्य असे. अशा पाच नाईकांवर किंवा पंचवीस बारगीर किंवा शिलेदार यांजवर एक हवालदार असे. पाच हवालदारांवर एक जुमलेदार, पाच जुमलेदारांवर एक सुभेदार किंवा एक हजारी असे व दहा सुभेदारांवर एक पाचहजारी असे. हे सगळे सुभेदार व पाचहजारी सरनोबतांच्या हुकूमात असत. घोडदळाचा सरनोबत अर्थात निराळा असे. पंचवीस घोड्यांस एक पालखी व एक नालबंद असे. या सर्वांना दरमहा रोख वेतन मिळे. महाराजांपाशी तोफखाना होता. प्रत्येक किल्ल्यावर तोफा ठेवलेल्या असत.
आरमार

राज्यसुरक्षिततेसाठी जसे लष्कर आवश्यक तसेच कोकणपट्टी, समुद्रकिणारी व सागरी व्यापार यांच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांना आरमार आवश्यक वाटले. या गरजेतूनच मराठ्यांचे आरमार उदयास आले. शिवाजी महाराजांकडे इंग्रज लोकांच्या म्हणण्यप्रमाणे 1665 मध्ये 30 पासून 150 टन वजनाची लहानमोठी 85 गलबते व 3 मोठ्या डोलकाठ्यांच्या गुराबा अशी जहाजे होती. पुढे गुराबांची संख्या 66 पर्यंत वाढली होती. या सर्व आरमारावर 5000 पर्यंत आरमारी सैनिक होते. त्यांजवर मुख्याधिपती म्हणून एक सुभेदार असे. आरमारासंबंधीची कामे कारभारी, कारखानीस व सबनीस यांच्यामार्फत होत. आरमाराचा सर्व खर्च महालोमहालीचे शासकीय कोषागार व कोठारे यांतून होई. आरमाराच्या साहित्याकडे शिवाजी महाराजांचे विशेष लक्ष असे. जहाजावरील खलाशांना मासिक तीन होन, सुभेदारास 3000 होन वार्षिक वेतन असे. इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणेच दोन हजार, एक हजार व पांचशे होन असे वार्षिक वेतन मिळे.
मराठा साम्राज्याचा ऱ्हास
मराठा साम्राज्याचा ऱ्हासाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत
वारसाहक्काचे युद्ध
छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यूनंतर त्याचे पुत्र संभाजी आणि राजाराम यांच्यात वारसाहक्काचे युद्ध झाले. संभाजी विजयी झाला पण नंतर त्यांना मुघलांनी पकडले आणि मारले. राजाराम गादीवर बसले पण मुघलांनी त्यांना जिंजी किल्ल्यावर पळून जाण्यास भाग पाडले.
राजकीय रचना : अंतर्गत विभाग
मराठा साम्राज्याच्या पतनाचे दुसरे कारण म्हणजे त्यांची स्वतःची रचना. त्याचे स्वरूप संघराज्याचे होते जेथे सत्ता प्रमुख किंवा सरदारांमध्ये सामायिक केली जात असे.
कमकुवत मुत्सद्देगिरी
इतरत्र काय चालले आहे आणि आपले शत्रू काय करत आहेत हे शोधण्याची तसदी मराठ्यांनी घेतली नाही. दूरदृष्टी असलेले राजकारण किंवा प्रभावी धोरण नव्हते. ते त्यांच्या सभोवतालच्या शक्तींशी युती करण्यात अयशस्वी ठरले.
अँग्लो-मराठा युद्धे आणि सहायक युती
1802 मध्ये पेशवा बाजीराव ।। ने बेसिनच्या तहावर स्वाक्षरी करून सहायक युती स्वीकारली. यामुळे मराठा साम्राज्याचे अधःपतन झाले. 1818 पर्यंत मराठ्यांची सत्ता शेवटी चिरडली गेली आणि मध्य भारतात त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान सरदारांनी ईस्ट इंडिया कंपनीचे अधिपत्य स्वीकारले.
मराठा साम्राज्याचा कालावधी
17 व्या शतकात मराठा साम्राज्याचे भारतीय उपखंडाच्या मोठ्या भागावर वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 1674 पासून हे साम्राज्य औपचारिकपणे अस्तित्वात आले आणि 1818 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून पेशवा बाजीराव ।। च्या पराभवाने संपले.
मराठा साम्राज्य विरुद्ध मुघल साम्राज्य
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघालासोबत बऱ्याच लढाया केल्या. त्यापैकी काही महत्वाच्या लढाया खालील दिलेल्या आहेत

प्रतापगडाची लढाई
इ.स 10 नोव्हेंबर 1659 रोजी महाराष्ट्रातील सातारा शहराजवळील प्रतापगड किल्ल्यावर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सेनापती अफझल खान यांच्यात लढाई झाली.
कोल्हापूरची लढाई
28 डिसेंबर 1659 ला महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराजवळ मराठा छत्रपती शिवाजी आणि आदिलशाही फौजा यांच्यात लढाई झाली.
पावनखिंडीची लढाई
मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशहाचा सिद्दी मसूद यांच्यात महाराष्ट्र, भारतातील कोल्हापूर शहराजवळ, किल्ले विशाळगडाच्या परिसरातील डोंगराच्या खिंडीत 13 जुलै 1660 रोजी लढाई झाली.
उंबरखिंडची लढाई
2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजीच्या नेतृत्वाखालील मराठा आणि मुघलांचा कारतलाब खान यांच्यात लढाई झाली.
पुरंदरची लढाई
1665 मध्ये मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्य यांच्यात लढाई झाली.
सिंहगडाची लढाई
4 फेब्रुवारी 1670 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहराजवळील सिंहगड किल्ल्यावर मराठा शासक शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे आणि मुघल सेनापती जयसिंग प्रथमच्या अधिपत्याखालील किल्लेरक्षक उदयभान राठोड यांच्यात लढाई झाली.
कल्याणची लढाई
1682 ते 1683 दरम्यान लढले ज्यात मुघल साम्राज्याच्या बहादूर खानने मराठा सैन्याचा पराभव करून कल्याण ताब्यात घेतले.
संगमनेरची लढाई
1679 मध्ये मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्य यांच्यात लढले गेले. मराठा राजा शिवाजीने लढलेली ही शेवटची लढाई होती.

वरील मराठा साम्राज्य यावर आधारीत माहिती आपणास कशी वाटले तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा?
वरील माहिती आपण पहा आणि आवडल्यास इतरांना ही नक्की Share करा.
धन्यवाद...!!

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!