● रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणे हे कार्य ........ करते?
→लसिका
● प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरणांना .......... म्हणतात?
→अभिस्तर ऊती
● फांद्यांची वाढ करणे व पाने व फुलांची निर्मिती करणे हे कार्य ........ ऊतीचे आहे?
→आंतरीय विभाजी
● जलीय वनस्पतींना खोडे व पाने यांना तरंगण्यास _ _ _ _मदत करतात?
→वायू ऊती
● सर सी व्ही रामन यांचे पूर्ण नाव?
→चंद्रशेखर वेंकट रामन
● सी व्ही रामन यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
→1930
● 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा केला?
→1987
● राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 या वर्षीची थीम कोणती आहे?
→विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान
● मेरूरज्जूमधील लांब पोकळीला ......... असे म्हणतात?
→मध्यनाल
● ........... ग्रंथी चेत्तासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात?
→अंत : स्त्रावी
● वनस्पतीची ........ प्रकाशानुवर्ती हालचाल दाखवते?
→प्ररोह संस्था
● सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाचे स्थिर अवस्था राखली जाते ; यालाच .......... असे म्हणतात .
समस्थिती
● खालीलपैकी कोणाचा प्रवाह चक्रीय नाही?
→सौरऊर्जा
● पेनिसिलीन या प्रतिजैविकाचे संशोधक कोण आहेत?
→अलेक्झांडर फ्लेमिंग
● .......... कृत्रिम खाद्यरंग म्हणून वापरतात?
→सनसेट यलो
● ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊन जाऊ शकतो या प्रमाणे संपूर्ण विश्वाचाही या ताऱ्याप्रमाणे अंत होऊ शकतो असा निष्कर्ष कोणी मांडला?
→स्टीफन हॉकिंग
● कृष्णविवर , विश्वशास्त्र , पूंज गुरुत्व 【क्वॉटम ग्रॅव्हीटी】 या शाखांमध्ये कोणाचे योगदान गौरविले जाते?
→स्टीफन हॉकिंग
● अनुवंशिक गुणसुत्रे बनण्यास कारणीभूत असलेल्या सर्व ६४ न्यूक्लीओटाइड ट्रिप्लेट्सचे विश्वेषण कोणी केले?
→डॉ.हरगोविंद खुराना
● जेम्स वॅटला कशाचे जनक म्हणून ओळखले जाते?
→वाफेवर चालणारी ट्रेन
● दृश्य प्रकाश तरंगांची लांबी......... ते ......... आहे.
→400 nm - 800 nm
● दृश्य - प्रकाश दुर्बिणीमध्ये प्रकाशाचे अंतर्वक्र आरशाद्वारे परावर्तन होत असल्याने या दुर्बिणीला .......... दुर्बीण म्हणतात .
→परावर्तक दुर्बिणी
● रेडिओ लहरी ग्रहण करण्यासाठी विशिष्ट दुर्बिणीचा वापर होतो त्यांना ......... म्हणतात.
→रेडिओ दुर्बीण
● वक्रीभवन दुर्बीण : भिंग : : परावर्तक दुर्बीण : ...........
→अंतर्वक्र आरसा
● परम - ८ooo हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ ......... आहेत?
→डॉ.विजय भटकर
● भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था ......... विषयात संशोधन करते?
→फिजिक्स
● परम - 8000 हा महासंगणक ........ मध्ये बनविण्यात आला ?
→1991
● आय.आय.टी.ची स्थापना सन ......... मध्ये ........ राज्यात झाली .
→11951, पश्चिम बंगाल
● वस्तूच्या कंपनामुळे _ _ _ _ ची निर्मिती होते?
→ध्वनी
● कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे _ _ _ _ होय?
→ऊर्जा
● न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला?
→चॅडविक
● आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत?
→सात
● _ _ _ _ हा वैश्विक द्रावक आहे.
→ पाणी
● ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते?
→ऑक्सीजन
● वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते?
→मांसाहारी
● अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?
→सुर्यप्रकाश
● प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?
→उंदीर
● मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात?
→पांढऱ्या पेशी
● वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
→सुर्यप्रकाश
● विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
→टंगस्टन
● गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
→न्यूटन






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!