» अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये विराट कोहली सर्वात जलद 26 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
» भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीचे अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये एकूण 48 शतक पूर्ण झाले आहेत.
» ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहली हा सर्वाधिक 11 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू ठरला आहे.
» महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने अहमदनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास परवानगी दिली आहे.
» महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
» मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न झाले.
» 2023 वर्षाच्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स मध्ये 47 देशाच्या यादीत भारत देश 45व्या क्रमांकावर आहे.
» 2023 च्या ग्लोबल पेन्शन इंडेक्स मध्ये नेदरलँड्स देश प्रथम स्थानावर आहे.
» IIT खरगपूर मधील डॉ. सुजॉय कुमार गुहा यांनी पुरुषासाठी गर्भनिरोधक इंजेक्शन विकसित केलें आहे.
» रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने अटारी येथील वाघा बॉर्डर वर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.
» केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाघा बॉर्डर वर उभरलेल्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
» रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP या योजने अंतर्गत नव्या रेल्वे गाड्याला नमो भारत हे नाव देण्यात आले आहे.
» रिजिनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम RRTP ची पहिली रेल्वे दिल्ली-मेरठ या मार्गावर धावणार आहे.
» भारताचा माजी क्रिकेट पटू सचिन तेंडुलकरच्या मुंबई वानखेडे क्रिकेट स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 01 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
» बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब केबल पुलाची लांबी 1300 मीटर आहे.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!