■ बिपीनचंद्र पाल
बिपिनचंद्र पाल हे लाल-बाल-पाल या त्रिकुटातील एक स्वातंत्र्य सैनिक होते. बिपिनचंद्र पाल हे प्रखर राष्ट्रवादीचे नेते होते तसेच शिक्षक, पत्रकार, लेखक व उत्कृष्ट वक्ते देखील होते. बिपिनचंद्र पाल यांना भारतीय क्रांतिकारक विचारांचे जनक म्हणून ओळखले जाते.त्यांचे वडील रामचंद्रपाल हे पेशकार तसेच प्रखर देशभक्त होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना वाटत होते. 1879 मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
〉 पूर्ण नाव
बिपीनचंद्र रामचंद्र पाल
〉 जन्म
07 नोव्हेंबर 1858
〉 मृत्यु
20 मे 1932
〉 वडील
रामचंद्र पाल
〉 आई
नारायणी देवी
〉 राजकीय पक्ष/संघटना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
〉 मातृभाषा
बंगाली भाषा
〉 नागरिकत्व
भारतीय 【ब्रिटिशराज】
■ कौटुंबिक माहिती
बिपिनचंद्र पाल यांचा जन्म एका संपन्न कुटुंबात 07 नोव्हेंबर 1858 रोजी झाला होता. यांचा जन्म अविभाजित भारताच्या हबीबगंज जिल्ह्यातील पोयल नावाच्या गावात झाला. त्यांचे वडील हे रामचंद्र पाल पारशी विद्वान व जमीनदार होते.
बिपीनचंद्र पाल यांनी “चर्च मिशन सोसायटी कॉलेज” या ठिकाणी शिक्षण घेतले व नंतर याच ठिकाणी शिक्षक म्हणून सुद्धा काम केले. हे महाविद्यालय कोलकाता विद्यापीठाशी संलग्न आहे.
अगदी लहान वयाचे असताना पाल हे ब्राम्हो समाजात सामील झाले व समाजातील इतर सदस्याप्रमाणेच त्यांनीही समाजातील दुष्कृत्ये व रूढीवादी परंपरांचा विरोध यांनी केला. अगदी लहान असताना जातीच्या आधारे भेदभावाविरुद्ध आवाज उठविला आणि आपल्यापेक्षा उच्च जातीच्या विधवा महिलेशी त्यांनी विवाह केला. लग्नानंतर त्यांना आपल्या कुटुंबाशी सबंध सुद्धा तोडावे लागले होते. पाल हे एक दृढ विश्वासू होते म्हणूनच कौटुंबिक सामाजिक दबावानंतर ही त्यांनी कोणत्याही प्रकारे तडजोड केली नाही
■ स्वातंत्र्य चळवळ
बिपिनचंद्र पाल हे 1886 मध्ये कॉंग्रेस पक्षात दाखल झाले. 1887 च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी सरकारने राबविलेला आर्म्स अॅक्ट कायदा भेदभाव करणारा असून तो तात्काळ माघे घ्यावा अशी मागणी केली.
लाल-बाल-पाल या तिन्ही क्रांतिकारकानी समाजातील तरुणांच्या भावनांना प्रेरित करून स्वत: सुद्धा क्रांतिकारक कार्यात भाग घेतला. पूर्ण स्वराज्य, स्वदेशी, परदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणासारखे राष्ट्रवाद पाल आणि अरविंद घोष यांनी वाढविला.
स्वदेशी, परदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून बिपिनचंद्र पाल यांनी राष्ट्रीय चळवळ पुढे आणली व त्यांचा विश्वास असा होता कि हे सगळे करून गरिबी व बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल.
बिपिनचंद्र पाल यांचे गांधीजींशी वैचारिक मतभेद होते. त्यांना ब्रिटीशांच्या राजवटीवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांचा असा विश्वास होता कि विनवणी व असहकार यासारखी शस्त्रे वापरून परकीय सत्तेचा पराभव करता येणार नाही या मतभेदामुळे आयुष्यातील शेवटच्या काही वर्षात त्यांनी कॉंग्रेस सोडली.
“बांदे मातरम्” या क्रांतिकारक मासिकांची स्थापना पाल यांनी केली. स्वदेशी चळवळीनंतर लोकमान्य टिळकांच्या अटकेनंतर व इंग्रजांच्या दडपशाहीच्या धोरणा नंतर ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी “इंडिया हाउस" मधील क्रांतिकारक विचारधारामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी स्वराज मासिकाच्या प्रकाशनास सुरुवात केली.
1909 मध्ये क्रांतिकारक मदन लाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीची हत्या केली. त्यावेळी "स्वराज” मासिकाचे प्रकाशन थांबविण्यात आले व त्यांनी लंडन मध्ये बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. या घटनेनंतर बिपिनचंद्र पाल यांनी स्वत: ला लढाऊ विचारसरणीपासुन दूर केले होते.
पाल यांनी अनेक वेळा महात्मा गांधीजींवर टीका केली व त्यांच्या मातांना विरोधही केला.1921 मध्ये गांधीजीं विषयी ते म्हणाले कि "तुमच्या कल्पना तार्किक नसून जादूवर आधारित आहेत”. वंदे मातरम् राजद्रोह प्रकरणात त्यांनी अरविंद घोष विरुद्ध साक्ष देण्यास नकार दिला ज्यामुळे त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली.
■ स्वातंत्र्यात पाल यांची भूमिका
1905 च्या बंगालच्या फाळणीत ब्रिटीश वसाहतवादि धोरणाविरुद्ध पहिले लोकप्रिय बंड सुरु करण्यास लाल-बाल-पाल जबाबदार होते.1907 मध्ये बाळ गंगाधर टिळकांच्या अटकेनंतर आणि सरकारी दडपण्याच्या वेळी बिपीन चंद्र पाल इंग्लंडला रवाना झाले.तिथे त्यांनी स्वराज पत्रिकेची स्थापना केली. त्याच काळात 1909 मध्ये कर्झन वायलीच्या हत्येनंतर झालेल्या राजकीय परिणामांमुळे त्याचे प्रकाशन बंद झाले गेले आणि याचा परिणाम म्हणूनच पाल यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे लंडनमध्ये त्यांचे मानसिक पतन होत गेले आणि ते राष्ट्रवादापासून दूर गेले. महात्मा गांधी यांच्यावर टीका करणारे बिपिनचंद्र पाल हे पहिलेच व्यक्ती होते.
■ पाल यांचे निधन
बिपिनचंद्र पाल यांचे निधन 20 मे 1932 रोजी झाले. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांनी स्वतःला कॉंग्रेसपासून दूर केले व एकाकी जीवन व्यतीत केले होते.
बिपीनचंद्र पाल यांच्या विषयीची ही माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!