■ 07 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1665
सर्वांत जुने जर्नल लंडन गॅझेट प्रथमच प्रकाशित झाले.
〉 1875
सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र चटर्जीनी लिहिले.
〉 1879
वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप 【काळ्यापाण्याची शिक्षा】 झाली.
〉 1917
पहिले महायुद्ध - गाझाच्या तिसऱ्या लढाईत इंग्रज फौजांनी गाझा ताब्यात घेतले.
〉 1936
प्रभातचा संत तुकाराम चित्रपट पुण्यात प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
〉 1944
फ्रँकलिन डी.रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
〉 1951
एम.पातंजली शास्त्री यांनी भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार स्वीकारला.
〉 1990
मेरी रॉबिन्सन या आयलंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या.
〉 2001
बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना दिवाळखोरीत गेली.
■ 07 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1858
लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म.
【मृत्यू - 20 मे 1932】
〉 1867
नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूटी यांचा वॉस पोलंड येथे जन्म.
【मृत्यू - 4 जुलै 1934】
〉 1868
व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म.
【मृत्यू - 30 एप्रिल 1913】
〉 1879
रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म.
【मृत्यू - 21 ऑगस्ट 1940】
〉 1884
क्रांतिकारक, गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म.
【मृत्यू - 22 जानेवारी 1967】
〉 1888
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म.
【मृत्यू - 21 नोव्हेंबर 1970】
〉 1900
स्वातंत्र्यसैनिक, चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुल ऊर्फ एन.जी.रंगा यांचा जन्म.
【मृत्यू - 9 जून 1995】
〉 1903
शिक्षणशास्त्र,मानस व बालमानस विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.
〉 1915
महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.
〉 1954
अभिनेता, निर्माता, कमल हासन यांचा जन्म.
〉 1960
भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद यांचा जन्म.
〉 1971
भारतीय दिग्दर्शक व पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म
〉 1975
भारतीय अभिनेते, दिग्दर्शक वेंकट प्रभू यांचा जन्म
〉 1980
भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.
〉 1981
भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म
〉 1824
डॉ.भाऊ दाजी लाड जन्मदिन
■ 07 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1562
मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन.
【जन्म - 5 डिसेंबर 1511】
〉 1862
दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन.
【जन्म - 24 ऑक्टोबर 1775】
〉 1905
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे निधन.
【जन्म - 7 ऑक्टोबर 1866】
〉 1923
भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन.
【जन्म - 25 जानेवारी 1856】
〉 1947
भारतीय- श्रीलंकन पत्रकार व राजकारणी के.नतेसा अय्यर यांचे निधन.
〉 1963
मराठी लघुकथाकार यशवंत गोपाळ तथा य.गो.जोशी यांचे निधन.
【जन्म - 17 डिसेंबर 1901】
〉 1980
हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्वीन याचे निधन.
【जन्म - 24 मार्च 1930】
〉 1981
अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुटांट यांचे निधन.
【जन्म - 5 नोव्हेंबर 1885】
〉 1998
शास्त्रीय गायक तसेच अभ्यासक पं.जितेंद्र अभिषेकी यांचे निधन.
【जन्म - 21 सप्टेंबर 1929】
〉 2000
ज्येष्ठ गांधीवादी नेते, हरितक्रांतीचे प्रणेते सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन.
【जन्म - 30 जानेवारी 1910】
〉 2006
भारतीय क्रिकेटर पॉली उम्रीगट यांचे निधन.
【जन्म - 28 मार्च 1926】
〉 2009
लेखिका सुनीता देशपांडे यांचे निधन.
【जन्म - 3 जुलै 1926】
〉 2015
भारतीय दिग्दर्शक व कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन.
【जन्म - 28 ऑगस्ट 1970】





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!