सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...
नंदिनी दास यांनी ग्लोबल कल्चरल अंडरस्टँडिंगसाठी 2023 चा ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड जिंकला आहे.
भारताचे केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री तसेच UAE चे शिक्षण मंत्री यांनी अबू धाबी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 'वर्ल्ड फूड इंडिया 2023' चे उद्घाटन करणार .
01 नोव्हेंबर रोजी राजभवन, गोवा येथे 8 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
थायलंडने 10 नोव्हेंबरपासून भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाची घोषणा केली.
नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे डॉक्टरांसाठी 'वन नेशन, वन रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म' सुरू केला जाणार.
भारत व कझाकस्तान यांच्यातील कॅझिंड 2023 संयुक्त लष्करी सरावाची 7 वी आवृत्ती सुरू झाली
【30 ऑक्टो ते 11 नोव्हें】
युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये साहित्यासाठी कोझिकोड व संगीतासाठी ग्वाल्हेर ही दोन भारतीय शहरे सामील झाली:
संशोधकांनी ओडिशातील महानदीत अवौस मोतला नावाच्या खाद्य माशांची प्रजाती शोधली असून स्थानिक मच्छिमारांनी या माशाचे नाव मोटला ठेवले आहे
ISRO चे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र मातृभाषा मल्याळममध्ये निलावू कुडीचा सिंहंगल नावाने लिहिले असून केरळस्थित लिपी पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.
आरोग्यासाठी शाकाहाराच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक शाकाहारी दिवस 1994 पासून 01 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
बांगलादेशी-ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ सलीमुल हक यांचे 71 व्या वर्षी निधन झाले
कॉलिन्स डिक्शनरीच्या एआय 【AI】 ला वर्ष 2023 मधील शब्द म्हणून नाव देण्यात आले आहे
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले
54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाणार आहे
2023 च्या 54 व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्राकडून चित्रपटांची निवड झाली आहे
अहमदनगर जिल्ह्यातील जखणगाव ग्रामपंचायतीने जाती निहाय जणगणना करण्याचा ठराव सर्वानुमते घेतला , असा ठराव घेणारी जखणगाव ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!