सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव करत आयसीसी विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले.
〉 निकारागुआच्या 'शेनिस पॅलासिओस' हिने 72 वी मिस युनिव्हर्स 2023 चा खिताब जिंकला.
〉 मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवचे 08 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
〉 19 नोव्हेंबर 2023 रोजी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला.
〉 कॅप्टन 'हिमाद्री दास' लिखित "बिल्डिंग पार्टनरशिप्सः इंडिया अँड इंटरनॅशनल को-ऑपरेशन फॉर मेरीटाईम" हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
〉 विराट कोहलीला आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला.
〉 कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता 'रायन रेनॉल्ड्स' यांना 'ऑर्डर ऑफ ब्रिटिश कोलंबिया' सन्मान मिळाला.
〉 उत्तर प्रदेश राज्य सरकारने अंतर्देशीय मत्स्यपालन-मैदानी क्षेत्रात संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला.
〉 नवी दिल्ली येथे इंडो-पॅसिफिक रिजनल डायलॉगचे आयोजन करण्यात आले .
〉 पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंझमाम उल हक यांची वरिष्ठ पुरुष संघाचा नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली.
〉 अंतराळ मोहिमांमध्ये स्वारस्य असलेल्या इच्छुकांसाठी ISRO ने 5 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह रोबोटिक्स चॅलेंज लाँच केले
〉 भारत व इटली यांनी युवा गतिशीलता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी दोन करारांवर स्वाक्षरी केली
〉 दीप्ती बाबुता पंजाबी साहित्यासाठी बाग धान पुरस्कार मिळवणारी पहिली महिला ठरल्या
〉 प्रसिद्ध कला इतिहासकार व पद्म पुरस्कार विजेते बी.एन गोस्वामी यांचे निधन
〉 बुकर पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक डेम एएस बायट यांचे निधन झाले
〉 हिमाचलचे मुख्यमंत्री सुखू यांनी "हिमाचल प्रदेशचे साप" या पुस्तकाचे प्रकाशन केले.
〉 18 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला.
〉 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर जागतिक AMR जागरूकता सप्ताह साजरा करण्यात येतो.
〉 लडाखने त्याच्या सीबकथॉर्नसह चौथा GI टॅग प्राप्त केला
〉 बिहारच्या राज्यपालांनी मागासवर्गीयांचा कोटा 50% वरून 65% पर्यंत वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!