■ 13 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1841
जेम्स ब्रेडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळाले.
〉 1864
ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले.
〉 1913
रविंद्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
〉 1921
वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यात अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
〉 1931
शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
〉 1947
सोव्हिएत युनियनने एके 47 बंदुक तयार केली.
〉 1970
बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे 5,00,000 लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती मानली जाते.
〉 1994
स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय दिला.
〉 2012
ऑस्ट्रेलिया व दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण दिसले.
■ 13 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1780
शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म.
【मृत्यू - 27 जून 1839】
〉 1850
इंग्लिश लेखक व कवी आर.एल.स्टीव्हनसन यांचा जन्म.
【मृत्यू - 03 डिसेंबर 1894】
〉 1855
आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म.
【मृत्यू - 14 जून 1916】
〉 1873
कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारीआणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ.मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म.
【मृत्यू - 10 मार्च 1959】
〉 1898
पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म.
【मृत्यू - 13 नोव्हेंबर 1969】
〉 1917
महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म.
【मृत्यू - 01 मार्च 1989】
〉 1917
हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म.
【मृत्यू - 11सप्टेंबर 1964】
〉 1954
सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म
〉 1967
अभिनेत्री जूही चावला यांचा जन्म.
■ 13 नोव्हेंबर निधन / पुण्यतिथी
〉 1740
प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन.
〉 1956
शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन.
【जन्म - 01 नोव्हेंबर 1893】
〉 2001
ज्येष्ठ लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन.
【जन्म - 15 ऑगस्ट 1917】
〉 2002
नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!