■ 25 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1664
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
〉 1922
मधुमेह आजारावरील इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक बॅटिंगनी यांनी जाहीर केला.
〉 1948
नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
〉 1975
सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
〉 1981
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
〉 1991
कमल नारायण सिंग यांनी भारताचे 22 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
〉 1994
डॉ.रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता इंडियन सायन्स काँग्रेसचा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.
〉 1999
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
〉 2000
सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
■ 25 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1841
जर्मन गणितज्ञ आनर्स्ट श्रोडर यांचा जन्म.
〉 1844
मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बैंझ यांचा जन्म.
【मृत्यू - 04 एप्रिल 1929】
〉 1872
नाटककार व पत्रकार, केसरीचे संपादक, नवाकाळचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म.
【मृत्यू - 26 ऑगस्ट 1948】
〉 1879
आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज साधू वासवानी यांचा जन्म.
【मृत्यू - 16 जानेवारी 1966】
〉 1882
मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म.
【मृत्यू - 30 मे 1968】
〉 1898
भारतीय अभिनेते, दिग्दर्शक देबाकी बोस यांचा जन्म
〉 1921
नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
〉 1926
भारताचे 21 वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म.
【मृत्यू - 13 सप्टेंबर 2012】
〉 1935
महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
〉 1939
मेवाती घराण्याचे सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म.
〉 1952
पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.
〉 1972
भारतीय क्रिकेटपटू दिपा मराठे यांचा जन्म.
〉 1983
भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
■ 25 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1885
स्पेनचा राजा अल्फान्सो 【बारावा】 यांचे निधन.
【जन्म - 28 नोव्हेंबर 1857】
〉 1922
प्राच्यविद्यासंशोधक,भाषाशास्त्रज्ञ पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन.
【जन्म - 20 मे 1884】
〉 1960
प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन.
【जन्म - 24 सप्टेंबर 1898】
〉 1962
आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन.
【जन्म - 06 जानेवारी 1868】
〉 1974
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन.
【जन्म - 22 जानेवारी 1909】
〉 1984
भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन.
【जन्म - 12 मार्च 1913】
〉 1997
लोकमतचे संस्थापक,संपादक व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांचे निधन.
〉 1997
मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन.
【जन्म - 14 में 1898】
〉 1998
प्रशासक व मुत्सद्दी,योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी.एन.हक्सर यांचे निधन
【जन्म - 04 सप्टेंबर 1913】
〉 2013
बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन.
【जन्म - 05 सप्टेंबर 1920】
〉 2014
भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना व कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन.
【जन्म - 08 नोव्हेंबर 1920】
〉 2016
क्युबाचे क्रांतिकारक व पंतप्रधान फिडेल अलैहांद्रो कॅस्ट्रो रुझ यांचे निधन.
【जन्म - 13 ऑगस्ट 1926】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!