■ 18 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
〉 1493
ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
〉 1809
फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
〉 1882
अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
〉 1905
लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे 17 वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
〉 1918
लाटव्हियाने आपण रशियापासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले.
〉 1928
वॉल्ट डिस्ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.
〉 1933
प्रभातचा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.
〉 1955
भाक्रा नांगल धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली.
〉 1962
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
〉 1963
पहील्या पुश बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
〉 1992
ललित मोहन शर्मा यांनी भारताचे 24 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार स्विकारला.
〉 1993
दक्षिण अफ्रिकेत 21 राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
〉 2015
टेनिसपटू टॉजर फेडररने नोव्हाक जोकोविचला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूरलंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला
〉 2015
पी.व्ही.सिंधू ला काउलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना माटीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
〉 2015
किदाम्बी श्रीकांतला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेईने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
〉 2015
भारतीय शटलर जयरामचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले
〉 2015
भारतीय महिला दुहेरी जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.
〉 2015
भारतीय स्क्वॉश खेळाडू सौरव घोशालचा बेलिबी येथे जागतिक स्क्वॉश स्पर्धेत इंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्रापने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.
■ 18 नोव्हेंबर जन्म / जयंती
〉 1898
भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म
〉 1901
चित्रपटनिर्माते,दिग्दर्शक,अभिनेते,पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म.
【मृत्यू - 30 ऑक्टोबर 1990】
〉 1906
मिनी कारचे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म.
【मृत्यू - 2 ऑक्टोबर 1988】
〉 1909
कॅपिटल रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म.
【मृत्यू - 06 ऑक्टोबर 1976】
〉 1910
क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म.
【मृत्यू - 20 जुलै 1965】
〉 1931
हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक श्रीकांत वर्मा यांचा जन्म.
〉 1945
श्रीलंकेचे 6 वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.
■ 18 नोव्हेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1772
मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन.
【जन्म - 16 फेब्रुवारी 1745】
〉 1830
इल्युमिनॅटिचे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन.
【जन्म - 06 फेब्रुवारी 1748】
〉 1936
भारताचे वकील व राजकारणी व्ही.ओ.चिदंबरम पिल्लई यांचे निधन. 【जन्म - 05 सप्टेंबर 1872】
〉 1962
अणूचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन.
【जन्म - 07 ऑक्टोबर 1885】
〉 1993
लोणावळा येथील मनःशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु.रा.भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.
〉 1996
समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.
〉 1998
भारतीय कॅनेडियन पत्रकार व प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन.
【जन्म - 15 नोव्हेंबर 1936】
〉 1998
सातारचे समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.
〉 1999
स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.
〉 2001
नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचेनिधन.
〉 2006
मराठी कथाकार व कवी हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन.
【जन्म - 06 एप्रिल 1917】
〉 2013
भारतीय संगीतकार एस.आर.डी.वैद्यनाथन यांचे निधन.
【जन्म - 15 मार्च 1929】
〉 2014
भारतीय दिग्दर्शक तसेच निर्माते सी.रुधराय्या यांचे निधन.






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!