■ संविधान दिन
देशभरात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
परंतु संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
■ संविधान दिनाचे महत्व
आपल्या भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
■ संविधान दिनानिमित्त - वन लायनर प्रश्नोत्तरे
〉 भारताने राज्यघटना स्वीकार...... रोजी केली ?
» 26 नोव्हेंबर 1949
〉 भारतीय राज्य घटना कधी अमलात आली ?
» 26 जानेवारी 1950
〉 घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
» डॉ. राजेंद्रप्रसाद.
〉 भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी....... घटना आहे ?
» लिखित.
〉 भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला ?
» 02 वर्षे 11 महीने 18 दिवस.
〉 भारतीय संविधान हे....... आहे.
» अंशता संघात्मक व अंशता एकात्मक.
〉 भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ?
» एकेरी.
〉 भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?
» इंग्लंड.
〉 संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?
» अमेरिका.
〉 मूळ भारतीय घटनेत किती मूलभूत अधिकार होते ?
» 07
〉 44 व्या घटनादरूस्ती नुसार...... हा मूलभूत अधिकार रद्द झाला ?
» संपत्तीचा.
〉 42 व्या घटना दरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले ?
» समाजवादी
धर्मनिरपेक्ष
अखंडता.
〉 मूलभूत अधिकारांशी संबंधीत कलमे कोणती ?
» कलम 12 ते 35
〉 संसदेशी संबंधित कलम कोणते आहे ?
» कलम 79 ते 122
〉 राज्यसभेत सर्वात जास्त प्रतींनिधी कोणत्या राज्यांचे असतात ?
» उत्तर प्रदेश.
〉 घटनेनुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती ?
» 250
〉 संसदेच्या दोन अधिवेशना मधील कालावधी जास्तीत जास्त....... एवढा असावा ?
» सहा महिने.
〉 राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते ?
» विधानसभा.
〉 संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात ?
» उपराष्ट्रपती.
〉 राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पुर्ण नियंत्रण कोणाचे असते ?
» विधिमंडळाचे
〉 महाराष्ट्राच्या विधान सभेत निर्वाचित सभासदाची संख्या किती असते ?
» 288
〉 मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे...... कार्य होत ?
» कल्याणकारी.
〉 _ _ _ _ हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो ?
राज्यपाल.
〉 शेती हा विषय कोणत्या सूचित देण्यात आला आहे ?
» राज्यसूची.
» विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो ?
» 06 वर्षे.
〉 लोकसभा हे कोणते सभागृह आहे ?
» अस्थायी.
〉 एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा असतो ?
» लोकसभा अध्यक्ष.
〉 संकटकालीन काळात लोकसभा कितीने वाढवण्यात येते ?
» 01 वर्षानी
〉 संघसूचित किती विषयाचा समावेश आहे ?
» 97
〉 राज्यसूचित किती विषयाचा समावेश आहे ?
» 66
〉 समवर्ती सूचित किती विषय आहे ?
» 47
〉 समवती सूचित विषयावर कायदा कोण बनवू शकते ?
» केंद्र व राज्य सरकार.
〉 लोकसभेचे मुदतपूर्व विर्सजन करण्याचा अधिकार कोणास आहे ?
» राष्ट्रपती.
〉 राष्ट्रपती कोणत्या कलमाने संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात ?
» 352
〉 आतापर्यत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली ?
» 03 वेळा
〉 दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ?
» संघराज्य.
〉 स्वातंत्राच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आला आहे ?
» कलम 19 ते 22
〉 भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती ?
» अंदाज समिती.
〉 42 वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत कारेणू6 आली होती ?
» 1976
〉 जास्तीत जास्त किती दिवस अर्थ विधेयक राज्यसभा स्वतः कडे ठेवू शकते ?
» 14 दिवस.
〉 घटना परिषदेची निर्मिती _ _ _ _ मध्ये कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नुसार झाली ?
» 24 मार्च 1946
〉 भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे?
» 22
〉 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या ?
» 1952
〉 वटहुकुम राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार काढतात?
» 123
〉 घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले ?
» 09 डिसेंबर 1946






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!