सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 25 नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात आला.
〉 श्वेतक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांची जयंती 26 नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरी केली जाते.
〉 बंगाल ग्लोबल बिझनेस समिटची 7 वी आवृत्ती कोलकाता येथे आयोजित करण्यात आली
〉 पोलाद मंत्रालयाने लोह आणि पोलाद क्षेत्रातील धातूशास्त्रज्ञांच्या योगदानासाठी राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार 2022 प्रदान केले
〉 2023 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारत 9 पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी
〉 भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
〉 राज्यातील प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत 2050 शाळांना 2026-2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री स्कूल ऑफ एक्सलन्स बनवले जाणार.
〉 हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेवर तरुणांना 40 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
〉 उपग्रह ब्रॉडबँडसाठी अंतराळात मंजुरी मिळवणारी पहिली कंपनी वनवेब इंडिया आहे.
〉 चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या रहस्यमय विषाणूचे नाव H9N2 【एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस】 आहे.
〉 भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान सेमीकंडक्टर करारावर स्वाक्षरी झाली आहे.
〉 भारत 2024 साठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद भूषवणार आहे.
〉 ISR ने काळी मिरीची उच्च उत्पन्न देणारी जात "चंद्रा" नावाने विकसित केली आहे.
〉 FICCI चे निर्वाचित अध्यक्ष म्हणून महिंद्रा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा यांना नामांकन करण्यात आले.
〉 डॅनियल नोबोआ यांनी इक्वेडोर या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
〉 पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
〉 रजनीश गोयल यांची कर्नाटकचे ४० वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!