भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे त्यांच्या या स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. 17 मे 1964 ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वर्षभरातील 365 दिवस पाहिले केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतेच त्यापैकी एक आजचा 14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात दरवर्षी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी प्रयागराज इथे त्यांचा जन्म झाला होता. लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण होता. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. पण भारतातल्या अनेक, किंबहुना प्रत्येक ब्रिजवर ही अशी उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली मुलं दिसतात, तेव्हा प्रत्येक नागरिकाचा जीव कासावीस होतो. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. बालदिनाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि हा दिवस कधीपासून साजरा केला जातो याबाबत जाणून घेऊया.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिन देशभरात साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलांबद्दल खूप आपुलकी, प्रेम आणि आपुलकी होती. त्यांनी मुले हीच राष्ट्राची खरी ताकद आणि समाजाचा पाया मानली. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलंही नेहरूजींना चाचा नेहरू म्हणत. या देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यात चाचा नेहरूंचे महत्त्वाचे योगदान होते. ते महान स्वातंत्र्यसैनिक होते. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची क्षमता आणि नेतृत्व क्षमता पाहून त्यांच्याकडे देशाची धुरा सोपवण्यात आली. त्यांनी कठीण परिस्थितीत देशाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि देशाने प्रगतीकडे वाटचाल केली. आज त्यांना स्मरण करण्याचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे.
चाचा नेहरू म्हणायचे की आजची मुलं उद्याचा भारत घडवतील, आपण मुलांची जितकी काळजी घेऊ तितकी राष्ट्राची उभारणी होईल. म्हणूनच या दिवशी आपण बाल कल्याणाविषयी बोललो नाही तर ते योग्य होणार नाही. खरे तर बालदिन सुरू करण्याचा खरा उद्देश मुलांच्या गरजा ओळखणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांचे शोषण रोखणे हा होता, जेणेकरून मुलांचा योग्य विकास होऊ शकेल. पण सत्य हे आहे की आजही देशातील हजारो मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळत नाही. बालमजुरीची समस्या प्रत्येक राज्यात पाहायला मिळत आहे. लहान मुलांना कारखाने, दुकाने, हॉटेल आदी ठिकाणी मजुरांसारखे काम करायला लावले जात आहे. या बालदिनानिमित्त आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण जमेल त्या मार्गाने बाल अत्याचार आणि बालमजुरी थांबवू. वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. त्यामुळे 'बाल दिन'च्या निमित्ताने त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं असं ठरविण्यात आलं. आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय बाल दिन विषयीची वरील माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!