■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 जागतिक एड्स दिन
■ 01 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉 1835
हान्स क्रिस्चीयन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
〉 1917
कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमध्ये बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
〉 1948
एस.एस.आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
〉 1963
नागालँड भारताचे 16 वे राज्य झाले
〉 1964
मालावी,माल्टा आणि झांबिया यांनी संयुक्त राष्ट्रांत प्रवेश केला.
〉 1965
भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली.
〉 1973
पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
〉 1976
अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
〉 1980
मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
〉 1981
AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
〉 1992
कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.
〉 1992
ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने 3970 मीटर 【13025 फूट】 उंचीवरून हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला
〉 1993
प्राच्यविद्या विशारद डॉ.रा.ना.दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ.चिं.ग.काशिकर आणि साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट.पदवी जाहीर.
〉 1999
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
〉 2000
नागालँड येथे दरवर्षी 01 ते 07 डिसेंबर दरम्यान होर्निवल महोत्सव साजरा करण्यास सुरवात झाली.
〉 2015
ज्येष्ठ पत्रकार डॉ.मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.
■ 01 डिसेंबर जन्म / जयंती
〉 1081
फ्रान्सचा रजा लुई 【सहावा】 यांचा जन्म.
【मृत्यू - 01ऑगस्ट 1137】
〉 1761
मॅडम तुसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तुसाँ यांचा जन्म.
【मृत्यू - 16 एप्रिल 1850】
〉 1885
साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म.
【मृत्यू - 21 ऑगस्ट 1981】
〉 1909
मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी.सी.मर्ढेकर यांचा जन्म.
【मृत्यू: 20 मार्च 1956】
〉 1911
पत्रकार,कथाकार,कवी,समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म.
【मृत्यू - 04 ऑक्टोबर 1966】
〉 1950
भारतीय जीवशास्त्रज्ञ मंजू बन्सल यांचा जन्म.
〉 1955
पार्श्वगायक उदित नाटायण यांचा जन्म.
〉 1960
भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ शिरिन एम. राय यांचा जन्म
〉 1963
श्रीलंकेचा क्रिकेटपटू,माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा जन्म.
〉 1980
भारतीय क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांचा जन्म.
■ 01 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1135
इंग्लंडचा राजा हेन्री पहिला यांचे निधन.
〉 1866
भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन.
【जन्म - 04 जुलै 1790】
〉 1973
इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन.
【जन्म - 16 ऑक्टोबर 1886】
〉 1985
स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन,
【जन्म - 18 जून 1899】
〉 1988
प्रा.गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन.
〉 1990
मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन.
【जन्म - 18 ऑगस्ट 1900】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!