■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 जागतिक पर्वत दिन
■ 11 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉 1816
इंडियाना हे अमेरिकेचे 19 वे राज्य बनले.
〉 1930
सी.व्ही.रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले
〉 1941
दुसरे महायुद्ध - जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
〉 1946
युनिसेफ 【UNICEF】 ची स्थापना झाली.
〉 1967
कोयना येथे 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन 180 जण ठार व 1500 लोक जखमी झाले.
〉 1972
अपोलो मोहिमेतील अपोलो 17 हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
〉 1994
अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेचेन्यामध्ये प्रवेश केला.
〉 2001
चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 【WTO】 मधे प्रवेश झाला.
〉 2006
अंतराळवीर सुनिता विल्यम आय.एस.एस. 【आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन】 वर पोहोचली.
■ 11 डिसेंबर जन्म / जयंती
〉 1843
क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी 1905 मध्ये नोबेल मिळालेले जर्मन डॉ.टॉबर्ट कोच यांचा जन्म.
【मृत्यू - 27 मे 1910】
〉 1867
आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म.
【मृत्यू - 25 मार्च 1940】
〉 1882
तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म.
【मृत्यू - 11 सप्टेंबर 1921】
〉 1892
योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.
〉 1899
कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.
〉 1909
साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.
〉 1915
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म.
【मृत्यू - 17 जून 1996】
〉 1922
अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.
〉 1925
मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म.
【मृत्यू - 01एप्रिल 2006】
〉 1929
लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म.
【मृत्यू - 31 मे 2002】
〉 1931
आचार्य रजनीश यांचा जन्म.
【मृत्यू - 19 जानेवारी 1990】
〉 1935
भारताचे माजी राष्ट्रपती आणि अर्थतज प्रणव मुखर्जी यांचा जन्म.
〉 1942
संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म.
【मृत्यू - 26 मार्च 1999】
〉 1969
भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.
■ 11 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1783
रघुनाथराव पेशवा यांचे निधन.
【जन्म - 18 ऑगस्ट 1734】
〉 1971
मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन.
【जन्म - 26 नोव्हेंबर 1902】
〉 1987
लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी.ए.कुलकर्णी यांचे निधन.
【जन्म - 10 जुलै 1923】
〉 1992
भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.
〉 1998
राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन.
【जन्म - 6 फेब्रुवारी 1915】
〉 2001
भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन.
【जन्म - 17 मार्च 1909】
〉 2001
झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन.
【जन्म - 21 जानेवारी 1930】
〉 2002
कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभाँय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन.
【जन्म - 16 जानेवारी 1920】
〉 2004
भारतरत्न गायिका एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.
〉 2013
भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
〉 2015
भारतीय चित्रकार व मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!