सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 नुकताच 13 जानेवारी रोजी लोहरीहा सण साजरा करण्यात आला.
〉〉 राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त मॉरिशस सरकारने हिंदू धर्माच्या अनुयायांना दोन तासांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली.
〉〉 नुकतीच विलियम लाई यांची तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
〉〉 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला अडीच अब्ज पौंडांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली.
〉〉 नुकतेच मुंबईत जयपूर समिट 2024 चे आयोजन करण्यात आले .
〉〉 उत्तरकाशीतील स्व.गिर्यारोहक सबिता कंसवाल यांना मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
〉〉 शास्त्रीय गायक डॉ. प्रभा अत्रे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
〉〉 पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरूर येथे 14 नवीन ग्रंथालयांचे उद्घाटन केले.
〉〉 नवी दिल्लीत नमो निओ-व्होटर रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आले.
〉〉 ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मलकानगिरी येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन केले.
〉〉 दीपा भंडारे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरल्या आहेत.
〉〉 रिंदम सांगवान हिने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले.
〉〉 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बॅचलर डिग्री पूर्ण केलेल्या किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केली.
〉〉 CREA अहवालानुसार मेघालयचे बर्निहाट हे 2023 मध्ये भारतातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे.
〉〉 हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024: भारतीय पासपोर्ट 80 व्या क्रमांकावर आहे
〉〉 IIT मद्रास श्रीलंकेत कँडी येथे नवीन कॅम्पस स्थापन करणार आहे
〉〉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना सन्मानित केले
〉〉 FIFA अध्यक्ष जियानी इन्फॅटिनो यांना दुबईत 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्वाचा पुरस्कार मिळाला
〉〉 भारतीय नौदलाला अदानी संरक्षण आणि एरोस्पेसकडून पहिले स्वदेशी दृष्टी 10 स्टारलाइनर ड्रोन मिळाले
〉〉 चीनच्या ओरियनस्पेसने आपले पहिले रॉकेट ग्रॅव्हिटी-1 लॉन्च केले






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!