सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 तेलंगणा राज्यात सिकंदराबाद परेड ग्राऊंडवर नुकताच 6 वा आंतरराष्ट्रीय पतंग आणि मिठाई महोत्सव सुरू झाला.
〉〉 14 जानेवारी रोजी 8 वा सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला.
〉〉 प्रिन्स फ्रेडरिक एक्स हा डेन्मार्क देशाचा नवा राजा झाला.
〉〉 भारत व मालदीव यांच्यातील उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली बैठक माले येथे पार पडली.
〉〉 प्रसिद्ध कवी मुनावर राणा यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले.
〉〉 भारत-अमेरिका जॉइंट ट्रेड पॉलिसी फोरमची 14 वी मंत्रीस्तरीय बैठक नवी दिल्लीत पार पडली.
〉〉 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 【INC】 मणिपूर राज्यातील थोबल जिल्ह्यातून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली.
〉〉 दीव येथे नुकत्याच झालेल्या बीच गेम्स 2024 मध्ये मध्य प्रदेश राज्य चॅम्पियन ठरले.
〉〉 अलीकडेच दुर्मिळ तिबेटी तपकिरी अस्वल सिक्कीम राज्यात सापडले आहे.
〉〉 आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली.
〉〉 दिल्लीचा पहिला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव' यमुनेच्या काठावरील बनसेरा बांबू पार्कमध्ये सुरू झाला.
〉〉 मालदीवने भारतीय सैनिकांना 15 मार्चपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे.
〉〉 महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात आटपाडी संवर्धन राखीव स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.
〉〉 जम्मू-काश्मीरच्या राजौरी व पूंछमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केले.
〉〉 अध्यात्मिक शहर वाराणसीने प्रयागराजला मागे टाकून स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या स्वच्छ गंगा टाउन श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावले.
〉〉 महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा डार्क स्काय पार्क असलेला भारतातील पहिला व आशियातील पाचव व्याघ्र प्रकल्प ठरला आहे.
〉〉 मणिपूर राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे?
〉〉 भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रिय T 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे?






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!