सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 06 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह साजरा केला जाणार आहे.
〉〉 प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
〉〉 विनेश फोगटने सिनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
〉〉 दिस मोमेंट म्युझिक अल्बमला 66 व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला.
〉〉 लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
〉〉 नायब बुकेले हे दुस-यांदा एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष बनले.
〉〉 राष्ट्रीय बाल भवन, नवी दिल्ली येथे 2 दिवसीय उलास मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
〉〉 प्रख्यात धावपटू पीटी उषा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
〉〉 भुवनेश्वर, ओडिशातील बारामुंडा ISBT ला बीआर आंबेडकर नाव दिले जाणार आहे.
〉〉 डिजिटल व्हिसा देणारे फ्रान्स हे पहिले EU राष्ट्र बनले आहे.
〉〉 गुजरातमधील कच्छमध्ये भारतातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिव्हल भारत रंग महोत्सवचे उद्घाटन झाले.
〉〉 ज्येष्ठ वकील राजेंद्र प्रसाद गुप्ता हे राजस्थानचे नवे महाधिवक्ता बनले.
〉〉 मिशेल ओ'नील उत्तर आयर्लंडच्या पहिल्या मंत्री बनल्या आहेत.
〉〉 इस्रोच्या गगनयान मोहिमेतून पहिली महिला रोबोट अंतराळवीर 'व्योमित्र' अंतराळात जाणार आहे.
〉〉 नांगोलो म्बुम्बा यांनी नामिबियाचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली
〉〉 सीडीएस अनिल चौहान यांनी पुण्यातील डिफेन्स लिट फेस्टमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय सुरक्षा पुस्तकाचे अनावरण केले.
〉〉 उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी कुलदीप चंद अग्निहोत्री यांच्या ट्रान्सफॉर्मिंग हरियाणा या पुस्तकाचे प्रकाशन केले.
〉〉 आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!