〉〉 जलद डिजिटल पेमेंटसाठी श्रीलंका आणि मॉरिशसने भारतीय पेमेंट सिस्टम UPI स्वीकारली.
〉〉 टेनिस पुरुष एकेरीत सुमित नागलने चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकली आहे.
〉〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ' मध्य प्रदेश' राज्यात रेल्वे, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प सुरू केले आहेत.
〉〉 संगीत नाटक अकादमी हैदराबादमध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे.
〉〉 भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद 2024 मुंबईत संपन्न झाली.
〉〉 सुत्तूर यात्रा महोत्सव 2024 म्हैसूर, कर्नाटक राज्यात सुरू झाला आहे.
〉〉 IREDA आणि IIT भुवनेश्वर यांनी स्वच्छ ऊर्जा नवोपक्रमासाठी सामंजस्य करार केला.
〉〉 दिल्लीत 57 व्या स्टेटसमन विंटेज आणि क्लासिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले.
〉〉 आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो?
〉〉 ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव करत अंडर - 19 क्रिकेट विश्व कप 2024 जिंकला.
〉〉 जागतिक बँकेच्या 2023 लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये 139 देशांपैकी भारत 38 व्या क्रमांकावर आहे.
〉〉 कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे सिक्कीम हे पहिले ईशान्येचे राज्य ठरले.
〉〉 केरळमधील वर्कला येथील पापनासम समुद्रकिनाऱ्यांने जगातील 100 सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये स्थान मिळवले.
〉〉 चिलीचे माजी राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!