सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 भारतातील पहिला फ्रेंच फिल्म फेस्टिव्हल कोलकाता येथे सुरू झाला.
〉〉 ISRO आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून INSAT-3DS प्रक्षेपित करणार आहे.
〉〉 भारताने कोलंबियासोबत आपला ओपन सोर्स डीपीआय शेअर करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
〉〉 प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
〉〉 केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जल जीवन मिशनच्या डॅशबोर्डवर सिटिझन कॉर्नर सुरू केला.
〉〉 ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत, रेल्वे संरक्षण दलाने 549 हून अधिक मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडले आहे.
〉〉 बांगलादेशची राजधानी ढाका येथे खासी हिल येथील स्वातंत्र्यसैनिक 'यू तिरोत सिंग' यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले
〉〉 नेपाळची राजधानी काठमांडू येथे 16 व्या वर्ल्ड सोशल फोरमची बैठक सुरू झाली.
〉〉 निखिल जोशी यांनी बोईग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
〉〉 अनिल कुंबळेनंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.
〉〉 भारताच्या मध्यवर्ती बँका आणि नेपाळ यांनी UPI-NPI ला जोडण्यासाठी करार केला.
〉〉 ली निंग श्रीलंका इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2024 च्या महिला एकेरीत ईशा राणी बरुआ' हिने सुवर्णपदक जिंकले.
〉〉 राजस्थानमध्ये मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना सुरू करण्यात आली.
〉〉 साउथ इंडियन बँकने जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान बैंक पुरस्कार जिंकला.
〉〉 प्रसिद्ध अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या कविता चौधरी यांचे नुकतेच निधन झाले.
〉〉 नुकतीच इंडोनेशियामध्ये जगातील सर्वात मोठी एकदिवसीय निवडणूक पार पडली.
〉〉 लंडन शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे?





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!