सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बिहार राज्यात नव्याने बांधलेल्या कालुघाट इनलैंड वॉटरवे ट्रान्सपोर्ट टर्मिनलचे उद्घाटन केले.
〉〉 दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजने आपला 125 वा स्थापना दिवस साजरा केला.
〉〉 आयएनएस जटायू लक्षद्वीपमध्ये आपला नौदल तळ उभारणार आहे.
〉〉 दिल्ली मेट्रो रेल कॉपोरशन 【DMRC】 आणि 'गती शक्ती विद्यापीठ', वडोदरा यांनी सामंजस्य करार केला आहे.
〉〉 इलेक्टोरल बॉडच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
〉〉 सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी हमरो संकल्प, विकास भारत पुष्पित सिक्कीम हा कार्यक्रम सुरू केला आहे.
〉〉 भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी ' संजय कुमार जैन' यांनी IRCTC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
〉〉 आयआयटी जम्मूने ध्वनी-आधारित ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे.
〉〉 जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) वर राष्ट्रीय परिषद 16 आणि 17 फेब्रुवारी 2024 रोजी' लखनौ उत्तर प्रदेश येथे आयोजित केली जाईल.
〉〉 युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघ वरील निलंबन मागे घेतले आहे.
〉〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुबईत भारत मार्ट'ची पायाभरणी करण्यात आली.
〉〉 जर्मन संशोधकांना बाल्टिक समुद्रात सुमारे 1 किलोमीटर लांबीची दगडी भिंत सापडली आहे.
〉〉 संरक्षण मंत्रालयाने 11 शक्ती इलेक्ट्रॉनिक वॉर फेअर सिस्टम्स खरेदी करण्यासाठी ' भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' सोबत करार केला आहे.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!