सर्व विषय तसेच विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 18 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान आग्रा येथे ताज महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
〉〉 भारतीय वायुसेनेने जैसलमेरमधील पोकरन येथे वायू शक्ती अभ्यास आयोजित केला आहे.
〉〉 प्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
〉〉 आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये हरमिलन बैन्सने सुवर्णपदक जिंकले.
〉〉 ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत.
〉〉 जर्मनीमध्ये 60 वी म्युनिक सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली आहे.
〉〉 नुकतेच बालकलाकार सुहानी भटनागर हिचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले.
〉〉 आसाम राज्यात खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे.
〉〉 हिमाचल प्रदेशने 12 व्या वार्षिक प्रवासी समीक्षा पुरस्कार 2024 मध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
〉〉 इंजिनियर्स इंडिया लिमिटेड 【EIL】 ने संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी IIT रुरकी सोबत करार केला.
〉〉 मिलान नौदल सरावाची 12 वी आवृत्ती विशाखापट्टणम येथे होणार आहे.
〉〉 युनायटेड नेशन्सच्या सामाजिक विकास आयोगाच्या 62 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भारताने भूषवले आहे?
〉〉 राजस्थानमध्ये करौली येथे अलीकडेच लोहखनिजाचे मोठे साठे सापडले आहेत?
〉〉 हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी वृक्षारोपण उपक्रमात समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी वन मित्र योजना सुरू केली?
〉〉 राजस्थानमधील नोखरा सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले?
〉〉 भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा उत्तराखंड राज्यात सुरु करण्यात येणार आहे?
〉〉 भारतातील राजस्थानमध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जगातिक विक्रम केला आहे?
〉〉 राजस्थानमध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात 1.33 कोटी नागरिकांनी सहभाग नोंदवत जागतिक विक्रम केला?





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!