सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉〉 20 फेब्रुवारी रोजी पेंग्विन जागरूकता दिवस साजरा केला जातो.
〉〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली.
〉〉 77 व्या बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये ओपेनहायमर ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
〉〉 लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
〉〉 हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये फ्रान्सने अव्वल स्थान पटकावले.
〉〉 भारत-जपान ऍक्ट ईस्ट फोरमची सातवी बैठक नवी दिल्ली येथे होणार आहे.
〉〉 अलीकडेच जम्मू आणि काश्मीर मध्ये एक नवीन MEMU आणि DMU ट्रेन धावणार आहे.
〉〉 हैदराबादमध्ये रामजी गोंड मेमोरियल फ्रीडम फायटर्स म्युझियम स्थापन करण्यात येणार आहे.
〉〉 गुवाहाटी येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची चौथी आवृत्ती सुरू झाली.
〉〉 इस्रोने युवा वैज्ञानिक कार्यक्रम युविका 2024 लाँच केला आहे.
〉〉 महाराष्ट्रातील पहिले चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशन धुळे जिल्ह्यात सुरू करण्यात आले.
〉〉 भारत आणि तैवानने तैवानमधील भारतीय कामगारांच्या रोजगारासाठी सामंजस्य करार केला
〉〉 कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आशा किराणा आय केअर योजना सुरू केली
〉〉 दिगंबर जैन समाजातील प्रसिद्ध संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे छत्तीसगडमध्ये डोंगरगडच्या चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले.
〉〉 एमएस धोनीची आयपीएलच्या सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!