सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
⊍ मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराचा राज्याचा स्थापना दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
⊍ नेपाळमध्ये नुकताच राष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला.
⊍ अनुष अग्रवालने भारताचा पहिला पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकला आहे.
⊍ श्रीलंकेत भारतीय गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत 1,300 घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले.
⊍ अरुणाचल प्रदेश राज्याने आपला 38 वा राज्यत्व दिन साजरा केला आहे.
⊍ केळी महोत्सव 2024 हा मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे.
⊍ केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर, ओडिशा येथे भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केले.
⊍ भौतिकशास्त्रातील शास्त्रज्ञ अदिती सेन दे यांना प्रतिष्ठेच्या घनश्यामदास बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
⊍ अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चौना मान यांनी भारत लोक संगीत-अरुणाचल उत्सव 2024 च्या लोगोचे अनावरण केले.
⊍ छत्तीसगड राज्यात पीएम श्री योजना सुरू करण्यात आली आहे.
⊍ प्रसिद्ध लेखक व काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर दे ला लीजन डी ऑनरने सन्मानित करण्यात आले.
⊍ बॉलिवूड अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले.
⊍ भारतीय फलंदाज शुबमन गिल आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबचा स्टेट आयकॉन बनला आहे.
⊍ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हिमालयन बास्केट लाँच केले आहे.
⊍ उत्तर कोरियाने जमिनीवरून समुद्रात मारा करणारे नवीन क्षेपणास्त्र पडासुरी-6 ची यशस्वी चाचणी केली.
⊍ 20 फेब्रुवारी रोजी जागतिक समुदाय सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
⊍ 20 फेब्रुवारी रोजी मिझोरम राज्याने आपला स्थापना दिन साजरा केला.
【भारतातील 23 वे राज्य 1987】
⊍ मध्य प्रदेश येथे प्रसिद्ध 50 वा खजुराहो नृत्य महोत्सव साजरा करण्यात आला.
⊍ 2024 मध्ये नवी दिल्लीत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे?
⊍ हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार, एकूण 62 देश भारतीय नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश देतात?
⊍ अलीकडेच प्रसिद्ध 'सोमिनसाई उत्सव' जपानमध्ये साजरा करण्यात आला





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!